राजगोपाल देवरा महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव

10 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील प्रशासनात गेल्या काही दिवसापासून फेरबदल करण्यास सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून नितीन करीर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या महसूल विभागाच्या (Rajagopal Deora) अतिरिक्त मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरा हे नियोजन विभागात कार्यरत होते.
 
Rajagopal Deora
 
ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची मदत व पुनर्वसन विभागात तरण या ठिकाणी असलेले असीम कुमार गुप्ता यांची नगरविकास 1 विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे. सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांची कृषी विभाग, राधिका रस्तोगी यांची पर्यटन विभागाच्या (Rajagopal Deora) प्रधान सचिवपदी तर या ठिकाणी असलेले विजय सौरभ यांची नियोजन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
संजय खंदारे यांची प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची (Rajagopal Deora) ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर. एस. जगताप यांची उपमहासंचालक यशदा तर, जितेंद्र डुड्डी सीईओ जिल्हा परिषद सांगली यांची सातारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.