‘लागबागच्या राजा’च्या पाद्यपूजनाने गणेशोत्सवाचा श्रीगणेशा

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
मुंबई, 
मुंबईतील अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि अवघ्या जगभरात ज्याची ख्याती आहे, अशा (Lagbagh Raja) ‘लालबाग राजा’ गणपतीचे पाद्यपूजन बुधवारी पार पडले. यंदा मंडळाने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने हे पाद्यपूजन केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती ही बाहेरून न आणता त्याच ठिकाणी घडवली जाते आणि तिथेच बाप्पाचे पाद्यपूजन केले जाते. दरवर्ष या पाद्य पूजन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो मुंबईकर बाप्पाचे चरणस्पर्श करण्यासाठी जातात. अत्यंत मोठा सोहळा केला जातो. यंदा (Lagbagh Raja) मूर्तिकारांच्या कार्यशाळेत अत्यंत साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पाद्यपूजन करण्यात आले.
 
Lagbagh Raja