कर्नाटकमध्ये भाडेकरूंनाही मोफत वीज मिळणार

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
बंगळुरू, 
कर्नाटकमध्ये (Karnataka free electricity) राज्य सरकारने सुरू केलेल्या गृहज्योती योजनेचा लाभ भाडेकरूंनाही मिळणार आहे. मु‘यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली. राज्यात 200 युनिटपर्यंत वीज सर्वांनाच मोफत मिळणार, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, हा लाभ नेमका कोणाकोणाला मिळणार, याबाबत संभ्रमाची स्थिती होती. त्यातच सरकारने या योजनेचा लाभ भाडेकरूंना मिळणार नाही, असे म्हटल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. विरोधी पक्षानेही टीकेची झोड उठवताच सरकारने आपल्या निर्णयाचा विस्तार केला आहे.
 
Karnataka free electricity