फेल्युअर पार्टी !

failure party कष्ट उपसल्याशिवाय काही मिळत नाही

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
वेध
 
- नंदकिशोर काथवटे
failure party ‘फेल्युअर पार्टी' हे दोन शब्द ऐकायला विचित्र वाटत असतील ना! कारण पार्टी तर यशाची होते, काही मिळविलं आणि काहीतरी कमावलं, की आपण याचाच आनंदोत्सव साजरा करतो. आपल्याकडे यश मोजण्याचे मापदंड जरा वेगळेचे आहेत. म्हणूनच आनंदाचे मोजमापदेखील आपण एका साच्यात घट्ट बसवून घेतलेले आहे. failure party यशाची गोडी त्याला परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून ठरते. परीक्षेत पूर्वी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण असे दोनच भाग होते. आताही दोनच आहेत. फक्त उत्तीर्ण होण्याची परिभाषा यशाचं मोजमाप करणा-यांनी बदलवून टाकली आहे. आता उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याला कुणी फारसे महत्त्व देत नाही तर त्याने किती टक्केवारी मिळविली, किती पर्सेन्टाईल मिळवलं, यावरून त्याच्या यशाचे मोजमाप केले जाते. हे तर झालं उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं; मात्र जे नापास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांचे काय? failure party ते नापास झाले म्हणजे, जणू त्यांनी काहीतरी गुन्हाच केला आहे किंवा आता ते नापास झाले म्हणजे त्यांचं आयुष्यच संपलेलं आहे, याच नजरेतून अनेक जण त्यांच्याकडे बघतात. चांगली टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या घरात आनंदाचे वातावरण असते.
 
 

failure party 
 
 
failure party एकीकडे जल्लोष असतो, पार्टी साजरी केली जाते तर दुसरीकडे नापास झालेल्या विद्याथ्र्याला सारेच कोसत असतात. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, नातेवाईक यापैकी किती जण त्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची मानसिकता समजून घेतात. या सगळ्यांची विचित्र वागणूक नापास झालेल्या मुलांच्या जिव्हारी लागते आणि मग ही मुलं टोकाचे पाऊल उचलतात. हे खरं आहे की, आपण मुलांना चांगले मार्क मिळावे, चांगल्या टक्केवारीने आपली मुलं उत्तीर्ण व्हावीत म्हणून जिवाचा आटापिटा करतो. failure party आपली जमापुंजी त्यांच्या शिक्षणावर खर्च करतो. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची माफक अपेक्षा ठेवलीच पाहिजे. पण काही कारणाने मुले अनुत्तीर्ण झाली किंवा त्यांना कमी गुण मिळाले तर अशावेळी त्यांना मानसिक आधार देण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. पण अशा मुलांना नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी बळ देणा-यांची संख्या समाजात फारच तोकडी आहे. failure party प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गोष्टीत माणूस पहिल्याच प्रयत्नात निपुण होतोच असे नाही. घरात रोज वर्षानुवर्षे स्वयंपाक करणा-या आईचा स्वयंपाकदेखील कधी कधी बिघडतो. म्हणून आईला स्वयंपाक करताच येत नाही किंवा ती स्वयंपाकात नापास झाली असे होत नाही. वर्षानुवर्षे व्यवसाय करणा-या आपल्या वडिलांच्या व्यवसायाचा चढता आलेख कधी कधी उतरंडीकडे येतो. याचा अर्थ वडील व्यवसायात नापास झाले, असा होत नाही.
 
 
प्रत्येक बॉलवर सिक्सर मारणारा एखादा क्रिकेटर एखाद्या बॉलवर बोल्ड होतो, याचा अर्थ त्याला क्रिकेट खेळता येत नाही किंवा तो नापास झाला, असा होत नाही. failure party एखादा गायकसुद्धा आपल्या पहिल्याच प्रयत्नात हृदयाला भिडणारं गाणं गायीलच असेही नाही तर कितीतरी वेळा रियाज केल्यानंतर त्यांच्या वाणीतून सुरेल गाणं जन्माला येतं. हे सगळं आपण किती सहजपणे मान्य करतो. मग अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या बाबतीतच का आपण विचित्रपणे वागतो. त्याला का धीर देऊ शकत नाही. या परीक्षेत नापास झाला म्हणून जीवनाची परीक्षा अजून बाकी आहे, असा दिलासा आपण का त्याला देऊ शकत नाही. failure party आपल्या नजरेत यश म्हणजे फक्त उत्तम मार्क, उत्तम आणि लठ्ठ पगाराची नोकरी इतकेच आहे का? आणि हेच जर यशाचं मापदंड असेल तर आपण चुकतो आहोत. म्हणूनच या चुकलेल्या लोकांपुढे फेल्युअर पार्टीचे आयोजन करून अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना उमेदीचा किरण दाखविणारे छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत चर्चेत येतात. अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना आधाराची, त्यांना समजून घेण्याची गरज असते. failure party त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील, अशी सकारात्मक दृष्टी देण्याची गरज असते आणि हे काम आयुक्त जी. श्रीकांत यांनी आयोजित केलेल्या ‘फेल्युअर पार्टी'ने केले आहे.
 
 
त्यांनी या पार्टीत १२ वीत नापास झालेल्या आणि कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत नृत्यावर ठेका धरला तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १२ वीत नापास झाल्यानंतरही यशाची शिखरं गाठलेल्या मान्यवरांचे मनोगत व मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आयुष्य संपत नसते. याची जाणीव यावेळी या ‘फेल्युअर पार्टी'तून करून देण्यात आली आणि त्या मुलांना पुन्हा नव्या उमेदीने, ताकदीने आपल्या आयुष्याकडे बघण्याची दिशा दिली. failure party अशा फेल्युअर पार्ट्या एकट्या संभाजीनगरमध्ये होऊन चालणार नाहीत तर नापास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात व्हायला हव्या. त्यांना पुन्हा नव्या जोमाने परीक्षेला सामोरे जाण्याची ताकदही द्यायला हवी. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' अशा म्हणी नुसत्याच ऐकण्यासाठी नाही, तर कष्ट उपसल्याशिवाय काहीच मिळत नाही, विद्यार्थ्यांना पालकांनी आणि समाजातील इतरही लोकांनी त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. failure party शिक्षणाचं मापदंड केवळ गुणांवरून न करता चांगले शिक्षण घेणं यावरून करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
९९२२९९९५८८