kolhapur riots कोल्हापुरात जी प्रतिक्रिया उमटली, ती योग्यच मानली पाहिजे. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला होता, याचा विसर पडून कसे चालेल? पण, त्यांचे नाव घेऊन राजकारण करणा-या काहींना विसर पडला आहे आणि ख-या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्याचे सोडून त्यांनी सत्ताधा-यांकडेच संशयाची सुई वळवली आहे. kolhapur riots राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तर नेहमीच औरंग्याच्या औलादींचा पुळका येतो. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणा-यांनी औरंग्याचे उदात्तीकरण करून एकप्रकारे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. kolhapur riots त्याबाबत शरद पवार कधी चकार शब्द बोलणार नाहीत. कारण दाढ्या कुरवाळण्यातच त्यांची राजकीय हयात गेली आहे. सत्यनारायणाची पूजा ते मान्य करत नाहीत. इफ्तारची पार्टी झोडताना मात्र त्यांना थोडाही संकोच वाटत नाही. शरद पवार हयात आहेत, तोपर्यंत हिंदूंवरील अन्यायाबाबत बोलतील, याची कोणतीही शक्यता नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थच! kolhapur riots औरंग्याच्या औलादींची बाजू घेताना शरद पवार आणि त्यांचा आता प्रादेशिक झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत बोललेला नाही. हा इतिहास आहे.
kolhapur riots आजवरचा अनुभवही आहे. संघ, भाजपा, हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर तोंडसुख घ्यायचे, सातत्याने मतपेटीच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळायच्या आणि तरीही स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे, हा यांचा उद्योग आता कायमचा बंद पाडण्याची वेळ आली आहे. ज्यांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवर स्टेटस म्हणून ठेवले, त्यांचा निषेध करण्याची हिंमत शरद पवार यांना दाखवता आली नाही. kolhapur riots कधीकाळी बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना जी आक्रमकता त्यांच्या शिवसेनेकडून दाखवली जायची, त्याची तर आता अपेक्षा करणेही व्यर्थ. कारण बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आता ‘जनाब' झाले आहेत. त्यांच्या राजकारणात उर्दूचा शिरकाव झाला आहे, त्यांच्या भगव्यातही हिरवा मिसळला आहे. त्यामुळे त्यांनीही कोल्हापुरातील घटनेचा निषेध करावा, ही शक्यता नाहीच. kolhapur riots उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मर्द गडी आहेत. कोल्हापुरात जे काही घडले, त्याचा त्यांनी तत्काळ निषेधच केला नाही, तर ज्यांनी कोणी औरंग्याचे स्टेटस ठेवले होते, त्या सगळ्यांना पोलिसांकरवी पकडून तुरुंगात पाठविले आहे. औरंग्याच्या अशा औलादींना महाराष्ट्रात मोकळे सोडले जाणार नाही, असा रोखठोक इशारा देऊन फडणवीसांनी आपल्या राज्यकारभाराची चुणूक दाखवून दिली आहे. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तर शिवरायांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. नाही मिळाली मते तर काय बिघडणार? kolhapur riots सत्ता येणार नाही. पण, शिवरायांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य तर अबाधित राहील ना? त्याची तरी जाणीव ठेवा. पण नाही.
शिवरायांना एका जातीपुरते मर्यादित करून जातिपातीचे राजकारण करीत शरद पवारांनी महाराष्ट्रात दुहीची बीजे रोवली आहेत. उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे. kolhapur riots कोल्हापुरात काल म्हणजे बुधवारी संतप्त हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्याची दखल घ्यायची सोडून आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्याचे सोडून शरद पवारांनी पुन्हा एकदा सत्ताधा-यांकडे बोट दाखवले आहे. सत्ताधा-यांचा काही संबंध नसताना आणि राज्यात उपद्रव निर्माण करून शांतता भंग करण्याचे षडयंत्र असामाजिक तत्त्वांकडून रचले जात असताना शरद पवार जर स्वत:च्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक ‘वेगळी' भूमिका घेत असतील तर त्यांचे पाय खोलात चालले आहेत आणि ते पुरोगामी महाराष्ट्राला रसातळाला नेत आहेत, असेच म्हटले पाहिजे. kolhapur riots आपल्या विदर्भातल्या अकोला शहरात कुण्या हिंदू कार्यकर्त्याने एक पोस्ट फॉरवर्ड केली असता शेकडो कट्टरपंथी ज्याप्रकारे पोलिस स्टेशनवर चाल करून गेले, ज्याप्रकारे त्यांनी हिंदू बांधवांची वाहने जाळली, दुकाने लुटली, अतिप्राचीन अशा राजराजेश्वराच्या मंदिरावर दगडफेक करण्याचे पाप केले, त्याचा साधा निषेध करण्याचे धाडस शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दाखवू शकला नाही. तिथे तर हिंदुत्ववादी संघटनांचा काही संबंध नव्हता. शरद पवार स्वत: हिंदू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करीत आले आहेत. kolhapur riots पण, छत्रपतींनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या स्वराज्याच्या रक्षणासाठी पवारांचे योगदान काय? दाढ्या कुरवाळून किती मते मिळतात हो तुम्हाला शरदराव?
उद्या जर संख्या वाढली आणि हिंदूंवर आक्रमणे सुरू झाली तर ते हे बघणार नाहीत की, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंदू आहेत आणि हे काँग्रेसचे हिंदू आहेत, यांना सोडून द्या. kolhapur riots इतिहास साक्षी आहे. रझाकारांनी केलेले अत्याचार फार जुने नाहीत. शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करायचे, राज्यातील अल्पसंख्य ब्राह्मणांना शिवीगाळ करायची, हिणवायचे, त्रास द्यायचा आणि औरंग्याच्या औलादींना पाठींबा द्यायचा, हे तुमचे घाणेरडे राजकारण फार दिवस चालणार नाही शरदराव! कोल्हापुरात जे घडले त्यासाठी सत्ताधा-यांकडे बोट दाखवण्यापूर्वी बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना काय आहेत, नेमका उपद्रव कुणी सुरू केला, औरंगजेबाचा फोटो स्टेटस म्हणून का ठेवला गेला, याचा शोध घ्या. kolhapur riots नंतर त्यातून बोध घ्या आणि मगच काही भाष्य करा. नेहमी राजकीय पोळी शेकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करू नका. तुम्ही कायम जातिपातीचेच राजकारण केले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला कधीही पुरोगामी वगैरे मानत नाही. तुम्ही स्वयंघोषित पुरोगामी आहात. वास्तव तर हे आहे की, एका विशिष्ट समाजाची बाजू घेत बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखावताना तुम्हाला कधीही संकोच वाटला नाही. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने तुमच्या पोटात दुखते आहे. तुम्हाला फडणवीसांचे सत्तेत असणेही खुपते आहे. kolhapur riots प्रत्यक्षात तुम्ही प्रतिगामी आहात. पुरोगामित्वाचे मुखवटे घालून राजकारण करताना तुम्ही सामान्य जनतेची फसवणूकच केली आहे. सामान्य माणसाला त्याच्या उपजीविकेची चिंता सतावत असते.
त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्दही त्याला माहिती नसतात. पण, तुम्ही हे शब्द त्यांच्या माथी मारत असता. बंद करा हे फालतूचे उद्योग. तुमचे असले राजकारण महाराष्ट्राला परवडणारे नाही. शांतता नांदली पाहिजे, कायदा-सुव्यवस्था स्थिती उत्तम राहिली पाहिजे, याची जबाबदारी ही सगळ्यांचीच आहे. एका समुदायाने चिथावणीखोर कृती करायची आणि हिंदूंनी संयम बाळगायचा, हे कुठपर्यंत चालणार? kolhapur riots कशाकरिता हिंदूंनी संयम बाळगायचा आणि का म्हणून सतत हिंदूंनाच असले सल्ले दिले जातात? आधी अंगावर जाणार नाही, पण अंगावर आलात तर सोडणार नाही, ही भूमिका चुकीची कशी असू शकते? कोल्हापुरात हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून कुठल्याही प्रकारे हिंसाचार वगैरे केला नव्हता. सगळे काही शांततेत चालू होते. मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी द्यायलाच हवी होती. निषेध व्यक्त करणे हा बहुसंख्य हिंदूंचा अधिकार आहे. तो तुम्ही कसा काय नाकारू शकता? हिंदूंनी नेहमी मारच खायचा, अशी तर कुणाची अपेक्षा नाही ना? kolhapur riots असेल तर जुने दिवस विसरून जा. पवारांसारख्यांनी केलेल्या जातिपातीच्या राजकारणामुळे बेसावध झालेला हिंदू आता जागा झाला आहे, सावध झाला आहे. काय आपल्या हिताचे आणि कशात अहित आहे, हे ओळखण्याची त्याची विवेक बुद्धी आता जागृत झाली आहे. त्यामुळे एकतर्फी संयमाची अपेक्षा करणे आता विसरून जा!