जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

    दिनांक :08-Jun-2023
Total Views |
- 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुसद,
बुधवारी मध्यरात्रीनंतर 1.30 वाजता माहिती मिळाल्यावरून एका हॉटेलमध्ये Gambling जुगार एक्का-बादशाह नावाचा पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकून एकूण 11 आरोपींकडून रोख, मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 3 लाख 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा चालविणार्‍यासही आरोपी करण्यात आले आहे.
 
 
Jugar
 
उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद लोहकरे, जमादार दिगंबर घुमनर, सिद्धार्थ कांबळे व संदीप चव्हाण यांनी मध्यरात्री या हॉटेलवर धाड टाकली. यात Gambling जुगार खेळत असताना यश बबलू मिश्रा (वय 21), संदीप भाऊराव राठोड (28), कपिल परशराम जाधव (21), अमोल अमृत वाकोडे (27), अजय अशोक मस्के (29), अवनिश विजय कांबळे (26), पवन रामधन राठोड (32), गंगाप्रसाद रमेश मुळे (28), महेश रामेश्वर मिश्रा (55), युवराज जयसिंग राठोड (23) व संदीप कुंडलिक जमदाडे (27) यांना रंगेहात पकडण्यात आले. जुगार अड्डा चालविणारा लखन विजय ढेंगळे याच्यासह सर्व आरोपींवर कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा, सहकलम 109 भादंवि अन्वये पुसद शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.