नवी दिल्ली,
Shikhar Dhawan भारतीय क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. २०२१ पासून दोघांमध्ये हे प्रकरण सुरू आहे. तर धवन आणि आयशा 2020 पासून वेगळे राहत आहेत. धवन ऑगस्ट 2020 पासून आपला मुलगा जोरावरला भेटलेला नाही. पटियाला हाऊस कोर्टाने आयशाला तिच्या 9 वर्षांच्या मुलाला धवन आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात आणण्यास सांगितले आहे.
सध्या आयशा तिच्या मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत आहे. Shikhar Dhawan आयेशाने धवनच्या कुटुंबीयांशी मुलाच्या भेटीला घेतलेल्या आक्षेपावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने सांगितले की, शिखर धवनचे कुटुंब ऑगस्ट 2020 पासून मुलाला भेटलेले नाही. एकट्या आईचा मुलावर अधिकार नाही. शिखर धवनने आतापर्यंत एक चांगला पिता असल्याचे सिद्ध केले आहे, तर मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्यास ती का आक्षेप घेत आहे. त्यांना फक्त आपल्या मुलाला बघायचे आहे आणि एकत्र भेटायचे आहे. न्यायालयाने आयेशा धवनला स्वत: मुलाला भारतात आणावे किंवा धवन कुटुंबाला भेटण्यासाठी विश्वासू व्यक्तीमार्फत पाठवावे, असे निर्देश दिले आहेत.