पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी॥

    दिनांक :09-Jun-2023
Total Views |
‘पंढरीची पायी वारी, ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही।
पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी॥’
Pandharicha Warkari  : देवाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात ऐक्यता मानून सगुण परमात्म्याच्या नाम-रूपात्मक भक्तीचा अंगीकार वारकरी संतांनी केला आहे. त्या भक्तीचा एक भव्य आविष्कार म्हणजे पंढरीची पायीवारी! पंढरीची वारी (आषाढी वारी) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे व असं‘य वारकर्‍यांची भक्ती साधना आहे.
  
Pandharicha Warkari
 
आधी रचली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर॥
 
 
Pandharicha Warkari  : असे पंढरीचे समृद्ध असे वर्णन संत नामदेव महाराज यांनी करून ठेवले आहे. परब‘ह्म साकार होऊन पांडुरंग, विठ्ठल या नावाने, भीमातीरी ज्या पंढरपूर ग‘ामी स्थिरावले, त्या ठिकाणी वारंवार जाणे व येणे हे ‘वारी’चे स्थुलस्वरूप. महाराष्ट्र प्रांतातील भगवद्भक्त समुदायाच्या अंतःकरणातील भावनांच्या अभिव्यक्तीचा समष्टी समारंभ म्हणजे विठोबाच्या वारीचा सोहळा! ज्ञानोबा-तुकोबादिक संतांच्या पाल‘यांसमवेत शेकडो दिंड्यांतून लाखो वारकरी भावनेने प्रतिवर्षी पंढरपुरी येतात व हे जगप्रसिद्ध यात्रेचे उदाहरणही आहे. वारीमध्ये पायी चालणे हे गमन व भजन करणे हे गायन या कि‘यांच्या मुळाशी वारकरी भाविकांच्या हृदयात आपल्या उपास्य विठ्ठलाबद्दलचा प्रेमभाव हा अधिष्ठानभूत आहे.
 
 
काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार।
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाचा वारी कर॥
ही ज्ञानेशोक्ती वारी आणि वारकर्‍याचे तात्त्विक स्वरूप निर्देशित करते.
धन्य धन्य पंढरपूर। वाहे भीवरा समोर।
म्हणोनि नेमे वारकरी। करती वारी अहर्निशी।
 
 
Pandharicha Warkari  : पायी वारीची ही परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची पालखी अनुक‘मे आळंदी व देहू येथून तसेच इतर संतांच्या पाल‘या आपापल्या गावांमधून प्रस्थान करीत पंढरपूरकडे रवाना होतात. वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासूनही चालू होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेऊन गेले.
 
 
Pandharicha Warkari  : पंढरीश प्रभूला महाराष्ट्राच्या भिन्न भिन्न प्रांतात जे भक्त लाभले, ते आपल्या स्थानाहून पंढरपुरी आपल्या आराध्याच्या भेटीला जात. त्यांचे हे अनुकरण करत, त्यांच्यावर निष्ठा असणारा भाविक अर्थातच वारकरी त्याच मार्गाने पंढरीला जाऊ लागला; संतांच्या हयातीत व पश्चातही. त्याचे आज विस्तीर्ण ‘सोहळ्या’त रूपांतर झाले आहे. या पंढरपूरच्या वारीमध्ये प्रत्येक जण हा संतांप्रमाणे समजून, प्रत्येकाला विठ्ठलाचे रूप समजून सर्व वारकरी मोठ्या भक्तिभावाने हा प्रवास ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात पूर्ण करतात. एका अभंगात नामदेव म्हणतात की, पांडुरंगच भक्तांना सांगत आहे,
 
 
आषाढी कार्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गूज पांडुरंग॥
 
 
Pandharicha Warkari  : संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराज, शांतिब‘ह्म एकनाथ महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आदींकडून संतप्रभृती तत्कालीन प्रवास हा बहुतांशी ‘पायी’ केला जायचा, म्हणून कदाचित पंढरपूरला पायी जात. परंतु, आज दळणवळणाची माध्यमे इतकी प्रगत असताना ‘पायीच’ का? असा विचार ज्याने वारी अनुभवली त्याला कदापिही न पटणारा असेल. पंढरीच्या पायी वारीमध्ये नेमके काय मिळते, याची तपशीलवार माहिती शब्दात सांगणे तसे कठीणच. तथापि, संपूर्ण जग ज्या सुखाची अभिलाषा बाळगते त्याची शाश्वत प्राप्ती इथे होते, हे मात्र नक्की. त्या अनुषंगाने जन्मजन्मांतरातील प्रवासात विश्रांती प्राप्त करून घेण्यासाठी, सुखरूप देवाकडे जाण्यासंबंधी श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात...
  
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा॥
 
- संदीप जिवलग कोहळे (अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर)