मृग नक्षत्राचा शेतकर्‍यांनी साधला मुहूर्त

    दिनांक :09-Jun-2023
Total Views |
मानोरा, 
Mrig Nakshatra शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये नक्षत्रांना मोठे महत्त्व असून, मृग नक्षत्रात शेतकरी शेतामध्ये पेरणीसाठी मृग नक्षत्राच्या दिवशी तास काढून शुभ मुहूर्त साधत असतो. तालुयात सोयाबीन, तूर, कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे मोजके शेतकरी आजच्या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर स्वतःला आणि इतरालाही जगण्यासाठी अन्नधान्य देणार्‍या शेतमावलीच्या उदरात बियाण्याची पेरणी करतात.
 
 
mrug
 
मृग नक्षत्राचा प्रारंभ होऊनही मौसमी वार्‍यापासून आजच्या घडीला वंचितच आहे. तालुयामध्ये पेरणी योग्य पाऊस कुठेच झालेला नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची अजिबात घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून करण्यात आलेला आहे. सोयाबीन, तूर, कपाशी आणि इतरही पिकांच्या बियाण्याचे, Mrig Nakshatra खताचे व कृषी औषधांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच शेत शिवारात पेरणी करण्याचा आग्रह कृषी विभाग आणि जाणकार शेतकर्‍यांकडून सुद्धा करण्यात येत आहे. पेरणी योग्य पाऊसमान न झाल्याने सध्या पेरणी करणे अतिशय जोखमीचे आहे. अपेक्षित पाऊस झाल्यावरच बियाण्यांवर रासायनिक प्रक्रिया करून शेतकर्‍यांनी पेरणी करावी.