अक्षय भालेरावच्या मारेकर्‍यांना शिक्षा करा

09 Jun 2023 18:40:17
गडचिरोली, 
Akshay Bhalerao नांदेड जिल्ह्यातील बोडार गावातील तरुण अक्षय भालेराव यांनी आपल्या गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या कारणावरून जातीय द्वेशातून गावातील काही जातीयवादी तरुणांनी एक जून 2023 रोजी अक्षय भालेराव या तरुणाची हत्या केली. त्यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा करा, अशी मागणी अनुसूचित जाती विभाग काँग्रेसच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
 
 
 
 
TYUTY
 
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि पुरोगामी Akshay Bhalerao विचारांच्या महाराष्ट्रात आताही जातीयवादी कारणातून अशाप्रकारे हत्या होत असेल तर हे महाराष्ट्रासाठीच नाहीतर संपूर्ण देशासाठी निंदनीय बाब आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदयांनी नांदेड जिल्ह्यात घडलेल्या अक्षय भालेराव यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा करावी व यापुढे असे जातीयवादी कृत्य घडू नये यासाठी प्रयत्न करावे व स्वर्गीय अक्षय भालेराव या तरुणाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, एनएसयुआय अध्यक्ष गौरव आलाम, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष जितेंद्र मुनघाटे, सुधीर बांबोडे, निकेश कमिडवार, निलेश गेडाम, ज्ञानेश्वर पोरटे, रसिका कोवे, शीला नेता, किरण कुमरे, कमलाबाई कुमरे, मनीषा कुमरे, वनिता कुमरे, कांता मलगम, उर्मिला गेडाम आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0