सुधाकर कोहळेंवर शुभेच्छांचा वर्षाव

-वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

    दिनांक :01-Jul-2023
Total Views |
नागपूर,
माजी आ. सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यानिमित्ताने आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान, दीपस्तंभ फाऊंडेशन तसेच मित्र परिवारातर्फे आज जानकी नगरातील निवासस्थानी सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्या अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
Sudhakar Kohale
 
भाजपाचे महानगर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, चरणसिंह ठाकूर, अशोक मानकर, रमेश सिंगारे, किशोर वानखेडे, अरविंद गजभिये, मधु घाटे, डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. ज्ञानेश ढाकुलकर आदींसह भाजपाच्या तसेच डॉ. रवींद्र भोयर, विलास करांगळे आदी इतरही पक्षाच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. त्यांनी (Sudhakar Kohale) सुधाकर कोहळे यांचे अभीष्टचिंतन केले.
 
 
सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी कोहळेंच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रिघ लागली होती. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेला घालून त्यांचा सत्कार करून (Sudhakar Kohale) सुधाकर कोहळे आशीर्वाद घेत होते. यानिमित्ताने नेत्र, दंत व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यासही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शालिनीताई मेघे रुग्णालय, भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था, शासकीय दंत रुग्णालय आदींच्या वैद्यकीय पथकाने यास सहकार्य केले.