तभा वृत्तसेवा
ढाणकी,
संपूर्ण जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणार्या थोर महापुरुषाचे नाव देऊन schools van ढाणकी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे अगणित पीक आले आहे. ज्या विद्यार्थ्यांवर संपूर्ण शाळेचे अर्थचक‘ व शाळा उभी आहे, त्या विद्यार्थ्यांची अशा स्कूल बसमध्ये अधिक प्रमाणात बसवून हेळसांड व त्यांच्या जीवाशी खेळ करताना ढाणकी परिसरात दिसत आहे.
आपली स्वप्ने आणि इच्छा बाजूला सारून एकीकडे आपले अपत्य पुढे एका अत्यंत प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात उभे राहणार आहे व त्यात त्याने टिकायला हवे असेल तर बालवाडी, schools van नर्सरीपासून जे जे आवश्यक असेल ते करायला हवे, असा दृष्टीकोन पालकांनी बाळगणे चूक नाही. हाच दृष्टीकोन स्वाभाविक आणि व्यवहार्य आहे. अशाच बाबींचा फायदा या शाळा घेत आहेत. या स्कूल बसमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन व पायमल्ली करून वाजवीपेक्षा जास्त मुलांना आणत असताना शाळेचे मु‘याध्यापक कुंभकर्णी झोपेत आहेत का, त्यांना संस्था चालकांची संमती आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्य पालकांना पडतो आहे.
तेव्हा अशा दर्जाहीन तसेच schools van विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणार्या शाळा किती दिवस तग धरून राहतील हासुद्धा मोठा प्रश्न पडतो आहे. आरटीओने किती विद्यार्थी असायला पाहिजे ती मर्यादा घालून दिली आहे. पण याचे कुठेही पालन होताना दिसत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून सगळे नियम पायदळी तुडवून सर्रास कोंबड्या खुराड्यात भरतात तसे विद्यार्थी कोंबून वाहतूक शाळांच्या बसमध्ये चालू आहे.
पूर्वी शाळा हे ज्ञानार्जनाचे मंदिर, तर संस्थाचालक शिक्षणमहर्षी असायचे. आता चित्र वेगळे दिसत आहे. आता सगळे schools van व्यवसायाचे रूप आले असून पैसे कमविणे आणि सुविधा शून्य अशी गत असल्याचे चित्र आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की ‘उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य केल्याशिवाय थांबू नका..!’ पण आता पालकांना वेगळाच अनुभव येतो आहे. त्यामुळे, उठा, जागे व्हा आणि आपल्या पाल्यांना दिलेल्या मोबदल्याच्या सुविधा मिळत आहेत की नाही ते बघा. काही संस्थाचालकांच्या अशा लोभी वृत्तीमुळे शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडाला आहे. तेव्हा या बाबीकडे संबंधित शासकीय यंत्रणेनेही लक्ष घालणे देणे गरजेचे झाले आहे, असे पालक वर्गात चर्चिले जात आहे.