नाकातून घुसला आणि मुलाचा मेंदू खाल्ला!

    दिनांक :10-Jul-2023
Total Views |
अलाप्पुझा,
ate child's brain केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातून एका मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दूषित पाण्यात राहणाऱ्या अमीबाने एका मुलाचा बळी घेतला. या अमिबामुळे मेंदूमध्ये संसर्ग होतो. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, जवळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील पानवल्ली येथील एका 15 वर्षांच्या मुलाला प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस नावाच्या आजाराची लागण झाली होती.
 
 
amiba
मुलाच्या मृत्यूची पुष्टी करताना मंत्री म्हणाले की यापूर्वी देखील राज्यात या दुर्मिळ संसर्गाची पाच प्रकरणे नोंदवली गेली होती. अलाप्पुझा येथील तिरुमला वॉर्डमध्ये 2016 मध्ये असे पहिले प्रकरण समोर आले होते. ate child's brain त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये मलप्पुरममध्ये प्रत्येकी दोन प्रकरणांची पुष्टी झाली आणि 2020 आणि 22 मध्ये कोझिकोड आणि त्रिशूरमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आढळून आले. जॉर्ज यांनी सांगितले की, सर्व संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुर्मिळ मेंदूच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 100 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
 
साचलेल्या पाण्यात जिवंत अमिबा आढळल्याने हा संसर्ग होतो, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुक्त-जीवित, परजीवी नसलेले अमिबा जीवाणू नाकातून शरीरात प्रवेश करतात तेव्हा मानवी मेंदूला संसर्ग होतो. दुसरीकडे, या आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना दूषित पाण्यात अंघोळ टाळण्याचा सल्ला दिला आहे. या आजाराच्या मुख्य लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येतात. ate child's brain हा अमिबा इतका धोकादायक आहे की तो मेंदूच्या पेशी खातो आणि मेंदूमध्ये संसर्ग पसरतो. परिणामी, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. Naegleria Fowleri नावाचा हा अमिबा इतका लहान आहे की तो सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही. पण हा छोटा प्राणीसुद्धा माणसाला मारण्यास सक्षम आहे.