तभा वृत्तसेवा
गोंदिया,
संतती व कुटुंब नियंत्रणासाठी पुरुषांसाठी विना टाका family planning surgery नसबंदी शस्त्रकि‘या उदयास आली आहे. या पद्धतीत पुरुषांवर कोणतीही चिरफाड न करता केवळ 5 ते 10 मिनीटांत बिन टाका शस्त्रकि‘या केली जाते. असे असले तरी नसबंदी करण्यास जिल्ह्यातील पुरुष महिलांच्या तुलनेत उदासीन असल्याचे गत पाच वर्षातील प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. गत पाच वर्षात केवळ 5 हजार 270 पुरुषांनीच कुटुंब नियोजन शस्त्रकि‘या केल्याचे समोर आले आहे.
कुटुंब नियोजनात भागीदारी, आता family planning surgery पुरुषांचा सकि‘य सहभाग. हे घोषवाक्य स्पष्टपणे कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्याकडे निर्देश करते, मात्र पुरुष आजवर उदासीन राहिले आहेत. कौटुंबिक नियोजनाच्या बाबतीत पुरुषांचा सहभाग महिलांच्या तुलनेत अल्प आहे. पुरुष नसबंदीसाठी शासन प्रोत्साहन रक्कमही देते. असे असलेतरी जनजागृति अभावि जिल्ह्यातील नागरिक नसबंदीसाठी पुढे येत नाही. पुरुष नसबंदीबद्दल चुकीचे गैरसमज समाजात आहेत त्यात मु‘य म्हणजे पुरुष नसबंदीनंतर व्यक्ती नपुंसक बनते. मात्र यात कुठेही तथ्य नाही. आता पुरुष नसबंदीची सोपी व विना टाका पद्धती आली आहे. यात चीरा लावण्याची गरज नाही. नसबंदीबाबत महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही चेतना यायला हवी. आरोग्य विभागानेही यासाठी मोठ्या प्रमाणात जागृति करणे गरजेचे आहे.
मागील पाच वर्षांच्या कालावधतील family planning surgery पुरुष व महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रकि‘येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महिलांच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट होते. सन 2018-19 ते 2023-23 या कालावधत 5270 पुरुषांनी नसबंदी केली. तर याच कालावधीत 31895 महिलांनी कुटंब नियोजन शस्त्रक‘ीया केली आहे.
संतती नियंत्रणासाठी निरोध, तांबी, गर्भनिरोधक गोळ्या, पुरुष नसबंदी, स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रकि‘येबरोबरच महिलांना दुसरा सोपा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. शस्त्रकि‘या न करता नको असलेल्या family planning surgery गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन निःशुल्क उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली. एकदा इंजेक्शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता नाही. सोपा, सुरक्षित आणि उपयुक्त उपाय उपलब्ध झाला आहे. अंतरामुळे महिलांचा रक्तक्षय व बीजांडाच्या कर्करोगापासून बचाव होतो. लैंगिक संबंध, प्रजनन क्षमतेवर काहीच परिणाम होत नाही. इंजेक्शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यास सात ते दहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
- डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया