नागपूर,
NagDwar Yatra पचमढी क्षेत्रातील सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या नागद्वार तीर्थक्षेत्र यात्रेसाठी मध्यप्रदेश सरकारने १० दिवसांची परवानगी दिली आहे. १२ ते २२ पर्यंत ही यात्रा चालणार आहे. NagDwar Yatra संबंधित क्षेत्र सातपुडा टायगर रिझव्ह कोअर झोन मध्ये येते त्यामुळे यावर्षी कोणत्याही भाविकांना सोबत नेलेले प्लॅस्टिक पर्वतरांगेत फेकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. NagDwar Yatra प्लॅस्टिक संकलनासाठी प्रशासन व सेवाभावी मंडळातर्फे विशेष व्यवस्था केली जाणार आहे. महादेव मेळा समितीची शनिवारी पचमढी येथील संजय गांधी संस्थेमध्ये बैठक झाली.
बैठकीला समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी नीरजकुमार सिंह, उपजिल्हाधिकारी सुजान सिंह, पोलिस उपअधीक्षक गुरुचरण सिंग, क्षेत्र संचालक कृष्णमूर्ती उपविभागीय अधिकारी संतोष कुमार तिवारी, उमाकांत झाडे, दौलतराव कावळे, रवींद्र ठाकरे, प्रमोद सोनारघरे, प्रकाश ठाकरे, नागेश जुनघरे, सौरभ गौरकर, गजानन चौधरी, मनोहर महाकाळकर इत्यादी उपस्थित होते. NagDwar Yatra या बैठकीत मंडळांना ७ ऑगस्टपासून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळांना अन्न शिजवण्यासाठी मागणीनुसार गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जातील. NagDwar Yatra रेलिंग शिडी दुरुस्ती केली जाईल. कचरा पेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. येथे नवी रेलिंग लावली जाईल, असे प्रशासनाकडून आश्वस्त करण्यात आले.
सोबत सुरक्षितेसाठी पोलिस व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. NagDwar Yatra या यात्रेकरिता १० लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून, नागद्वार यात्रेसाठी १० दिवसात सुमारे ८ लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी हा आकडा दहा लाखांवर जाण्याची शक्यता आहे. NagDwar Yatra त्यामुळे होणाऱ्या वाढीव गर्दीचा अंदाज घेऊन व्यवस्था करण्याची विनंती महादेव मेळा समितीतर्फे करण्यात आली आहे.
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र