दोन दुचाकींची धडक, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

    दिनांक :10-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या bikes collide अपघात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज 10 जुलै रोजी शहरातील उडाण पुलावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. सचिन बघेले (30) रा. कन्हारटोला/पिंडकेपार असे मृतकाचे नाव आहे. चंद्रसेन बिसेन (27) रा. कन्हारटोला/पिंडकेपार, करण चव्हाण (25), अमित रहिले (28) रा. दोन्ही खातिया ता. जि. गोंदिया अशी जखमिंची नावे आहेत.
 
bikes collide
 
प्रत्येक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन हा त्याचा सहकारी चंद्रसेन सोबत रेलटोली कडून जयस्तंभ चौकाकडे दुचाकी क‘मांक एमएच 35 एक्स 2755 ने जात असताना जयस्तंभ चौकाकडून एसटी बस स्थानकाकडे जाणार्‍या भरधाव दुचाकी क‘मांक एमएच 35 एक्यू 0890 यांची उडड्ाण पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली. यात सचिन याचा bikes collide घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीवर बसलेला चंद्रसेन व दुसर्‍या दुचाकीवरील करण व अमित गंभीर जखमी झाले. नागरिक व पालिसांच्या मदतीने चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. सचिनला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. करण व अमितला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर उड्डाण पुलावर 20 मिनिटे वाहतुक कोंडी झाली. रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संदेश केंजले व त्यांचे सहाकारी तथा जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून वाहतुक सुरळीत केली. रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.