इतस्तत:
- डॉ. विवेक राजे
Awesome without Allah अहमदिया मुसलमान हे मुस्लिम नाहीतच. बोहरी कुठले आले मुस्लिम. शिया हे अर्धे कच्चे मुसलमान. खरं तर फक्त वहाबी हेच सच्चे मुस्लिम. जो दररोज पाच वेळा नमाज पढेल, रमजानमध्ये संपूर्ण रोजे ठेवेल तोच सच्चा मुसलमान. स्त्रियांना जन्नत नसीब नही होती. Awesome without Allah हिजाब आणि बुर्खा ठेवलाच पाहिजे. अखेरचा रसूल मुहंमद आणि एकमेव देव अल्ला; या सगळ्या नियमांना कंटाळून इस्लाम सोडणारे आज जगात खूप लोक आहेत. ते आज स्वतःला ‘एक्स मुस्लिम' म्हणवून घेतात. ही सध्याच्या अमेरिकेतील एक धार्मिक आणि सामाजिक चळवळ होय. Awesome without Allah या चळवळीची एक हॅशटॅग आहे. ऑसम विदाऊट अल्लाह! सगळ्या जगभरात सध्या हा विशेष लोकसमूह चर्चेचा आणि लोकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. माजी मुस्लिम किंवा एक्स मुस्लिम अशी स्वतःची ओळख सांगणारा, छोटासा, स्वतःला काहीसे लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारा, असा हा समूह आहे. Awesome without Allah एखाद्याने एखादी धर्मश्रद्धा जोपासावी किंवा नाही, हा वास्तविक त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. या बाबतीत हिंदू धर्म हा एकच धर्म संपूर्ण उदारता जोपासणारा धर्म आहे.

हिंदू धर्मात तुम्ही जन्मानेच हिंदू होता. हिंदू होण्यासाठी कोणताही विधी करावा लागत नाही की कोणत्याही मंदिराशी वा पंथाशी संलग्न होण्याची आवश्यकता नसते. तुम्ही देवाचे अस्तित्व मानले तर तुम्ही हिंदू असता; देवाचे अस्तित्व न मानले तरी तुम्ही हिंदूच असता. तुम्ही सश्रद्ध असलात तरी हिंदू, अश्रद्ध असलात तरी हिंदू ! Awesome without Allah कर्मकांडी असलात तरी हिंदू, वेदांती असलात तरी हिंदू आणि दोन्हीही नसलात तरीही हिंदूच असता. एवढी प्रचंड उदारता, स्वातंत्र्य अंगभूत असणारा आणि त्याचा उस्त्रघोष करणारा हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे, असेच म्हणावे लागते. इस्लाम हा आज सगळ्यात जास्त बदनाम झालेला धर्म आहे. अगदी अनेक मुसलमानदेखील यावर सहमत होतील. कारण, एक म्हणजे जगातील जवळजवळ सर्व आतंकवादी, दहशतवादी हे इस्लाम धर्मीय आहेत. अनेक निर्दोष, अश्राप लोकांची हत्या करण्यात हे इस्लामिक अतिरेकी आघाडीवर आहेत. वरून यांच्या दहशतवादी कारवायांचा इस्लामने कधीही निषेध केलेला नाही. Awesome without Allah किंबहुना इस्लामिक अतिरेकी संघटना आणि त्यांच्या कारवायांना तात्त्विक मुलामा देण्याचे काम मात्र इस्लाममधील अनेक बुद्धिमान लोक इमानेइतबारे करताना आढळतात.
कोणताही मुस्लिम अभ्यासक वा विचारवंत या धर्मात, म्हणजेच कुराणात आणि हदिसमध्ये काही काळसुसंगत सुधारणा करणे, बदल करणे, गरजेचे आहे असे म्हणत नाही. यामुळे इस्लाम सोडणारे हे लोक आपण मुसलमान नाही, हे जाहीरपणे सांगताना दिसत नाहीत. उलटपक्षी जिवाच्या भीतीने ते आपण इस्लामच्या दृष्टीने अश्रद्ध झालोत, हे लपवूनच ठेवतात. Awesome without Allah अमेरिकेत पी. ई. डब्लू. रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अमेरिकेत जन्म घेतलेल्या मुसलमानांपैकी आजच्या घडीला २३ टक्के लोक स्वतःची मुस्लिम म्हणून ओळख सांगू इच्छित नाहीत. बहुतेक लोक याची जाहीर वाच्यतादेखील करू इच्छित नाहीत. राजकीयदृष्ट्या मुस्लिम मूलतत्त्ववादी सरकार अस्तित्वात असलेल्या तुर्कस्तानात आज अनेक तरुण इस्लामकडे पाठ फिरवताना दिसून येतात. त्यामुळे आपल्या शिक्षण धोरणात इस्लाम समजावून सांगण्यात काही गडबड घडते आहे का, असा या सरकारला संशय निर्माण झाला आहे. Awesome without Allah आपल्या इस्लामिक शिक्षण धोरणात काही चूक तर नाही ना, याचा विचार तेथील सरकारला करावा लागतो आहे. इथल्या अनेक मशिदी ओस पडल्या आहेत, असे सांगतात.
२०१२ मध्ये घेण्यात आलेल्या एका चाचणी सर्वेक्षणात, ५०२ अरब लोकांपैकी १९ टक्के अरबांनी आपण धर्मश्रद्ध नाही, असे मत नोंदवले, तर ५ टक्के लोकांनी आपण नास्तिक असल्याचे सांगितले. सौदी अरेबियामधील ही टक्केवारी १० वर्षांपूर्वीची आहे, हे लक्षात घेतले तर आज निश्चितच इस्लामवर श्रद्धा नसलेल्या मुसलमानांची संख्या अनेक पटींनी वाढलेली असेल, असे म्हणण्यास जागा आहे. Awesome without Allah सौदी अरेबियाचे राजे मुहम्मद बिन सलमान यांनी आपल्या धार्मिक धोरणांत ढील दिल्यानंतर या परिस्थितीत अजूनच बदल झाला असेल, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. एकूणच जगभरात मुस्लिम धर्माचा त्याग करणा-या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना दिसते. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातदेखील या ‘एक्स मुस्लिम' किंवा माजी मुसलमान समुदायाचे अस्तित्व जाणवत नाही. Awesome without Allah निदान असे नास्तिक मुसलमान आपल्या अश्रद्ध असण्याची वा इस्लामचा त्याग केला असण्याची जाहीर वाच्यता करताना दिसत नाहीत. तसे रमजानच्या महिन्यात रोजे न ठेवणारे किंवा फक्त शुक्रवारी रोजा ठेवणा-यांची संख्या मोठी आहे. पण या गोष्टींची जाहीर वाच्यता केली जात नाही.
असाच एक अपवाद म्हणजे वासीम रिझवी जे हिंदू होऊन जितेंद्र नारायण त्यागी झाले. अधूनमधून घरवापसी झाल्याच्या घटना घडतात, पण अजूनही मुसलमान या धर्मनिरपेक्ष देशात राहून, इस्लामला कंटाळलेले असूनही, खुलेपणाने सनातन हिंदू धर्माचा स्वीकार करताना दिसत नाहीत. याला अनेक कारणे आहेत. Awesome without Allah यातील सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे या देशात मागील शंभर वर्षे मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करण्याच्या नादात मुस्लिम आक्रमकता आणि इस्लामिक हिंसा जोपासली गेली. काँग्रेसी सरकारांनी मुस्लिम समाजाला अनेक सवलतींपासून वंचितच ठेवले. पण आपण वंचित आहोत याचे या समाजाला योग्य ते भान येऊ नये अशीच तजवीज केली. सर्व प्रकारांच्या ज्ञानापासून या समाजाला वंचितच ठेवले. सर्वसामान्य मुस्लिम समाजासाठी कोणतीही योजना राबविली गेली नाही. Awesome without Allah ‘हज हाऊस'साठी अनुदान दिले, हज यात्रेसाठी सवलती दिल्या, कुठे उर्दू भाषेला बढावा दिला. पण समान नागरिक कायदा सर्वसामान्य मुसलमानांच्या हिताचा कायदा आहे, याचे ज्ञान दिले नाही. परिणामस्वरूप ‘अशरफी' मुसलमान फायद्यात राहिला. त्याचवेळी ‘अजलफी' मुसलमानाला वंचित ठेवण्यात आले. पण याच ‘अजलफी' मुसलमानांकडून काही हत्या मात्र निश्चितच घडवून आणल्या गेल्या.
या आक्रमकतेची इस्लाम सोडू इच्छिणा-या सामान्य मुसलमान माणसाला भीती वाटते. इस्लाममधील कालबाह्य आणि सारासार चुकीच्या गोष्टींचा उल्लेख करणा-याला भीती वाटते; नव्हे त्याचे उच्चारण करण्यासही मुसलमान घाबरतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग मुस्लिम समाजाचा एक घटक दुस-या घटकाला घाबरून इस्लामचा त्याग न करता तसाच दबून कुढत, घाबरत जीवन जगत राहतो. Awesome without Allah दुसरे म्हणजे मुस्लिम असलेल्या व्यक्तीला किंवा मुस्लिम समाज सहभागी असलेल्या कोणत्याही घटनेला भारतीय प्रसिद्धी माध्यमातून देण्यात येणारा अग्रक्रम आणि महत्त्व. उदाहरणार्थ, एखाद्या हिंदू रिक्षा चालक माणसाने जर एखाद्या प्रवाशाची रिक्षात विसरून राहिलेली बॅग प्रामाणिकपणे परत नेऊन दिली, तर या घटनेची बातमी म्हणून दखल घेतली जात नाही. मात्र, जर याच उदाहरणात रिक्षा चालक मुसलमान असला तर मात्र त्याचा उदो उदो करण्यात येतो. अशा या महत्त्वामुळे भारतात मुसलमानांना अल्पसंख्यक म्हणून आणि मुस्लिम म्हणून अनेक फायदे मिळत असतात. Awesome without Allah ते फायदे आणि महत्त्व बहुसंख्य हिंदू समाजाचा घटक म्हणून मिळणे जवळजवळ अशक्य कोटीतील असेल तर कोणताही माणूस इस्लामचा त्याग करण्याचा विचार करणार नाही.
तिसरे म्हणजे आजही हिंदू समाजच इस्लामचा त्याग करून सनातन हिंदू धर्मात प्रवेश करणाèयांचे स्वागत करण्यास तयार नाही. कारण, इथे फक्त स्वागत करून काम भागणार नाही, तर हिंदू होणा-या प्रत्येक माणसाला संरक्षण देणे, त्याचा सन्मान राखणे, त्याचा सर्वार्थाने स्वीकार करणे ही बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाची जबाबदारी होऊन जाते. Awesome without Allah ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आज तरी कोणतीही संघटनात्मक संरचना हिंदू समाजात अस्तित्वात दिसत नाही. त्यामुळे भारतात इस्लामला कंटाळलेले अनेक मुसलमान असले आणि त्यातही प्रामुख्याने स्त्रियांचा समावेश असला, तरी ‘एक्स मुस्लिम' होण्यासाठी ‘ऑसम विदाऊट अल्लाह' अशी हॅशटॅग चालविण्यासाठी कोणी तयार नाही. वास्तविक, अश्रद्ध मुस्लिम किंवा एक्स मुस्लिम हे धर्मांतर घडवून घरवापसी करण्यासाठी पोटेन्शियल असलेला लोकसमूह असतो. हिंदू समाजाने यावर विचार केलाच पाहिजे.
९८८१२४२२२४