Poverty in India जगातील सर्वाधिक लोकसं‘या असलेल्या भारतात गरिबीचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, भारताने गरिबीवर मात करण्याच्या दृष्टीने मोठी कामगिरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. गेल्या 15 वर्षांत भारतातील 41.5 कोटी नागरिक दारिद्र्यातून बाहेर आल्याचे युनोने म्हटले आहे. 2005-06 ते 2019-21 या कालावधीमतील ही आकडेवारी असल्याचे युनोच्या अहवालात म्हटले आहे. या 15 वर्षांच्या काळात देशातील गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाली. केवळ भारतच नाही, तर आणखी 25 देशांनी या काळात आपल्या गरिबी इंडेक्समध्ये सुधारणा घडवून आणली आहे. वैश्विक बहुआयामी गरीबी इंडेक्सने ही आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक‘म (यूएनडीपी) आणि ऑक्सफोर्ड गरिबी आणि मानव विकास मोहीम (ओपीएचआय) या संस्थांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमध्ये ही माहिती दिली.
भारतातील पोषण संकेतांकानुसार, गरीब आणि वंचित लोकांची टक्केवारी 2005-06 मध्ये 44.3 टक्के होती. ती आता कमी होऊन केवळ 11.8 टक्के झाली आहे तसेच बालमृत्यू दर 4.5 टक्क्यावरून 1.5 टक्क्यांवर आला आहे. 2005-06 मध्ये 52.9 टक्के लोकांकडे अन्न शिजवण्यासाठी इंधन उपलब्ध नव्हते. आता ही सं‘या 13.9 टक्के आहे. Poverty in India पेयजलाच्या उपलब्धतेबाबत आकडेवारीत असे दिसून आले की, 2005-06 मध्ये 16.4 टक्के लोकांकडे शुद्ध पेयजल उपलब्ध नव्हते. ही सं‘या आता 2.7 टक्के झाली आहे. वीज पुरवठा उपलब्ध नसलेल्या व्यक्तींची आकडेवारी 2.9 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आहे. 2005-06 मध्ये 44.9 टक्के नागरिकांकडे घर नव्हते, ही सं‘या आता 13.6 टक्के झाली आहे.