चंद्रपूर,
Dr. Umesh Aggarwal येथील नेत्र चिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल (४८) यांनी स्वतःच्या राहत्या घरी विषारी 'इंजेक्शन' घेऊन आत्महत्या केल्याने येथील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य मार्गावरील चर्चच्या अगदी समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचे हॉस्पिटल आहे. त्याच हॉस्पिटलच्या वरच्या माळ्यावर त्यांचे घर आहे. सायंकाळी आठ वाजताचे सुमारास हॉस्पिटल मध्ये रुग्ण आला म्हणून परिचारक त्यांना बोलावण्यासाठी घरी गेला होता. त्यावेळी डॉ. अग्रवाल बेड रूम मध्ये पलंगावर झोपलेल्या अवस्थेत होते. यावेळी परिचारकाने डॉ.अग्रवाल यांना आवाज दिला. परंतु ते उठले नाही. यावेळी त्यांचा जवळ जावून बघितले आता त्यांचा श्वास बंद झाला होता.

घाबरलेल्या परिचारकाने आरडाओरड केली. समोरच डॉ. शिरीष चौधरी यांचे हॉस्पिटल आहे. त्यांना बोलावण्यात आले. यावेळी डॉ. चोधरी यांनी तपासले असता डॉ. अग्रवाल मृत पावले असे सांगितले. त्यानंतर जवळच राहत असलेले हृदयरोग चिकित्सक डॉ. झाडे यांनाही बोलाविले असता त्यांनी डॉ. अग्रवाल यांना मृत घोषित केले. डॉ. अग्रवाल यांचे बेड शेजारी इंजेक्शन पडून होते. ते इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. Dr. Umesh Aggarwal डॉ. अग्रवाल येथील मानसोपचार तज्ञ डॉ.इम्रान अली शिवजी यांच्याकडे उपचार घेत होते अशी माहिती आहे. डॉ. अग्रवाल यांच्या मागे डॉक्टर पत्नी व डॉक्टर मुलगा आहे. हे दोघेही डॉ. अग्रवाल यांनी आत्महत्या केली तेव्हा नागपुरात होते अशीही माहिती आहे.