गुंठेवारी भूखंड नियमानुकूलसाठी आणखी एक संधी

    दिनांक :13-Jul-2023
Total Views |
अकोला,
Maharashtra Gunthewari Development येथील शहर क्षेत्रातील नागरिकांच्या गुंठेवारी भूखंड व घरे नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव ऑफलॉईन स्वीकारण्याकरिता मनपा प्रशासनाकडून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ही शेवटची मुदत वाढ असून, त्यानंतर ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Maharashtra Gunthewari Development 
 
महाराष्ट्र गुंठेवारी विकास Maharashtra Gunthewari Development (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, 2001 यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम 12 मार्च 2021 अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत गुंठेवारी भूखंड/इमारत नियमानुकूल करण्याबाबत ऑनलाईन पद्धतीने मंजुरी प्रदान करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमध्ये काही तांत्रिक कारणास्तव मंजुरी प्रदान करण्यास विलंब होत असल्याचे तसेच नागरिकांना अकारण त्रास होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाव्दारे नागरिकांना अधिक सोईचे व्हावे यासाठी विशिष्ट कालावधी करिता ऑफलाईन पद्धतीने गुंठेवारी नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याची मुदत संपुष्टात आली होती; परंतू नागरिकांकडून यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहता आणि नागरिकांच्या विनंतीवरून गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव ऑफलाईन स्वीकारण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये शेवटची संधी म्हणून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत या कामास मुदतवाढ देण्यात येत आहे.31 ऑगस्टपर्यंत गुंठेवारी निमयानुकूल करण्याबाबतचे ऑफलाईन प्रस्ताव हे कार्यालयीन दिवशी अकोला महानगरपालिका सहाय्यक संचालक, नगररचना यांचे कार्यालय, तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालय येथे संपूर्ण आवश्यक कागदपत्रासह स्वीकारण्यात येतील असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
प्रस्ताव दाखल करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यात अर्ज, खरेदी खत 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे, नमूना ड/गाव नमुना सात, अभियंता यांनी प्रमाणित केलेला मोजणी नकाशा, खाजगी रेखांकन नकाशाची छायांकित प्रत, क्षतिपूर्ती बंधपत्र, लेजर पेपरवर, प्रतिज्ञा पत्र, स्वयंघोषित प्रमाणपत्र, चालू वर्षाचा मोकळ्या जागेच/इमारतीचा कर भरणा पावती, आधार कार्ड छायाप्रत. गुगल मॅप रंगीत फोटो, बांधकाम असल्यास स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), वीज देयक छायाप्रत, वास्तुविशारद, अभियंता, आरेखक यांचेकडील गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमावलीनुसार नकाशा तीन प्रती (अभियंता व अर्जदार यांचे स्वाक्षरीसह) आवश्यक आहेत.