आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न

Nagpur ZP डॉ. अजय डवले यांचे प्रतिपादन

    दिनांक :14-Jul-2023
Total Views |
नागपूर,
 
Nagpur ZP जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले आहे. Nagpur ZP जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. अजय डवले हे रुजू झाले आहेत. यापूर्वी ते अमरावती येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते. Nagpur ZP यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. दीपक सेलोकर यांची प्राध्यापक सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर या पदावर बदली झाली.
 
 
Nagpur ZP
 
 
Nagpur ZP डॉ. सेलोकर हे नागपूर जिल्हा परिषदेत मागील चार वर्षापासून कार्यरत होते. कोरोना या जीवघेण्या महामारीत त्यांनी दोन्ही वर्ष उत्कृष्टपणे आरोग्य सेवा दिली. संपूर्ण आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट सेवा देऊन लोकांचे प्राण वाचवले. नुकताच त्यांना आरोग्य विभागातर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. Nagpur ZP यावेळी सर्वांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. नवीन रुजू झालेले डॉ. अजय डवले यांनीही आरोग्य विभागाचा आढावा घेतला व आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यावर भर दिला. डॉ. अजय डवले यांचे संघटनेच्या वतीने डॉ. सोहन चवरे यांनी स्वागत केले व प्रलंबित आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली.Nagpur ZP  यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार, विस्तार अधिकारी (आरोग्य) बेनीप्रसाद चव्हाण उपस्थित होते.
 
 
सौजन्य : सोहन चवरे, संपर्क मित्र