इंझाळ्यात भानामतीच्या प्रकाराने खळबळ!

* नावं लिहलेले लिंबू आढळले

    दिनांक :15-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
घरातील खिडकीला बांधून असलेल्या कापडी बाहुलीच्या Bhanamati प्रतापाने घरात दोन ठिकाणी आग लागल्याची घटना तालुक्यातील इंझाळा(वेळा) येथे विठ्ठल हिंगे यांचे घरी घडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगितले. ही घटना काळ्या जादू किंवा भानामतीचे प्रकारातून घडली असल्याची कुटुंबाची धारणा असल्याने गावात दहशत पसरली आहे. या प्रकरणी हिंगे यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
Bhanamati
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवार 15 रोजी सकाळी घरातील खिडकीच्या Bhanamati जाळीला गेल्या 4-5 दिवसांपासून एक कापडी बाहुली बांधून असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ती बाहुली आज सकाळी तेथून काढण्यात आली. त्यानंतर हिंगे कुटुंबीयांना जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय आला. महत्त्वाचे म्हणजे या बाहुलीवर घरातील छोट्या मुलीचे नाव लिहिले होते. जादूटोणा किंवा भानामतीचे भीतीमुळे हिंगे कुटुंबीयांनी ही चेटकीण बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला.
 
 
ती Bhanamati बाहुली जाळताच तिकडे घराचे छपरावर वाळत घातलेल्या कपड्यांना आग लागल्याची घटना घडली. आग आटोक्यात येत असतानाच पुन्हा दुसर्‍या खोलीमध्येसुद्धा आग लागली. येथील कुटुंबियांचे कपडे आगीत पुन्हा जळाले. हा जादुटोण्याचाच प्रकार असावा, या दहशतीमुळे सदर कुटुंबीय घाबरले असून झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकार्‍याना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार अंधश्रद्धेतून घडला असून यात तत्थ नसल्याचे सांगण्यात आले.