तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
National Highway closed जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड- उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 253 वाहतुकीसाठी बंद आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात शनिवारी रात्री तथा रविवारी पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. वैनगंगा, वर्धा, अंधारी, इरई, पैनगंगा तथा अन्य नद्याना पाणी आहे.
सर्वाधिक पाऊस हा सावली तालुक्यात 143.5 मिमी, तर नागभीड तालुक्यात 123.6 मिमी झाला आहे. सततच्या पावसामुळे या तालुक्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासुनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. National Highway closed नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 253 या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर देखील पाणी साचले आहे.