कुरूम,
sand thief मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तसेच माना व कुरूम महसूल मंडळ हद्दीत दिवसा व रात्री अवैध रेती तस्करांनी रेती चोरीच्या मर्यादा ओलांडल्याने माना व कुरूम परिसरात अवैध रेती तस्करांचा सुळसुळाट झाला आहे.ही बाब मान्याचे नवे ठाणेदार सूरज सुरोशे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माना येथील ईदगाहजवळ चोरट्या मार्गाने रेती चोरून नेत असताना एक ब्रास भरलेला ट्रॅक्टर शनिवार, 15 जुलैच्या रात्री सापळा रचून पकडला त्यामुळे येथे खळबळ उडाली आहे.

रेती तस्कर हे सहसा रात्री रेती चोरतात हे दिसून आले आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवार 15 जुलै रोजी चोरट्या मार्गाने व भरधाव वेगाने ट्रॅक्टर इदगाह समोरून जात असल्याची गोपनीय माहिती गुप्त माना येथील ठाणेदार सूरज सुरोशे यांना मिळाली. त्यावरून ठाणेदार सुरोशे व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल पंजाब इंगळे, उमेश हरमकर,वाहन चालक मनोहर इंगळे यांनी 15 जुलै च्या मध्यरात्री 4 वाजून 14 मिनिटांनी एक ब्रास रेती घेऊन चोरट्या मार्गाने जात असलेला विनानंबरचा ट्रॅक्टर हा रंगेहात पकडला. sand thief आरोपी ट्रॅक्टरचालक सूरज ईश्वरदास समदुरे रा. बोर्टा याला अटक केली असून त्याच्याकडून एक ब्रास रेती किंमत 4 हजार रुपये, व एक ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत 7 लाख रुपये असा एकूण 7 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सूरज समदुरे याच्या विरुद्ध अवैध गौण खनिज चोरणे कलम 379 नुसारे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुरोशे यांच्या मार्गदर्शनात कॉन्स्टेबल वजनाथ धुळे हे करीत आहेत.