यवतमाळात इसमाची निर्घृण हत्या

17 Jul 2023 20:00:48
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
पिंपळगाव (Yavatmal Murder) येथील विश्वकर्मा नगरात चार ते पाच जणांनी मिळून एका इसमाची शारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. ही घटना रविवार, 19 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली. अवघ्या चार दिवसात घडलेल्या या दुसर्‍या हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. नितीन कवडू देसाई (वय 47) रा. तिरुपती सोसायटी दोनाडकर ले आऊट पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे. 16 जुलै रोजी नितीन आपल्या दुचाकीने विश्वकर्मा नगरात आला असताना चार ते पाच जणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून ते पसार झाले. नितीन याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
 
Yavatmal Murder
 
घटनेची माहिती मिळताच Yavatmal Murder अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, शहर ठाणेदार सतीश चवरे, सहायक पोलिस निरीक्षक देवीदास पाटील, आत्राम, पोलिस उप निरीक्षक शशी नवकार, महेश मांगुळकर, अंकूश फेंडर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठले होते.
नितीन देसाई Yavatmal Murder हत्याकांडातील दोन आरोपींना चार तासांत पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील आरोपी त्रिशय उर्फ सावन सुरेश राठोड (वय 20 वर्ष, रा. विश्वकर्मा नगर, पिंपळगाव), ऋषीकेश उर्फ बिल्ला अभय काळे (वय 20 वर्ष, रा. बुटले लेआऊट) पिंपळगाव व रोहित मडकाम (रा. यवतमाळ) यांनी गुन्हा केल्याबाबत निष्पन्न झाल्यावर आरोपी त्रिशय राठोड व ऋषीकेश काळे यांना चार तासांच्या आत ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
 
तिसरा आरोपी Yavatmal Murder रोहीत कामा याच्या शोधात यवतमाळ शहर व स्थागुशाचे पथक रवाना झाले. या प्रकरणी यवतमाळ शहर ठाण्यात मयूर ओमप्रकाश देसाईच्या तक‘ारीवरुन 302, 34 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, सपोनि संतोष मनवर, बंडू डांगे, सैयद साजीद, रुपेश पाली, अजय डोळे, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0