ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

17 Jul 2023 12:14:02
पुणे,
Dr. Mangala Narlikar ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९) यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या तेल्या काही दिवसांपासूंन कर्करोगामुळे आजारी होत्या. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे ११ वाजता अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या  डॉ. मंगला नारळीकर यांना कॅन्सरमुळे आजारी होत्या. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. मात्र, हा आजार पुन्हा उफळल्याने त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली. पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला.
 
 
SWAEWRE
 
मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. त्यांनी विद्यापीठातून पहिल्या येण्याचा बहुमान मिळवला. Dr. Mangala Narlikar १९६४ ते १९६६ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात सहायक संशोधक व त्या नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. तर १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात देखील गणिताचे अध्यापन केले.
Powered By Sangraha 9.0