कारंजा ते शिरपूर जैन बस सेवेचा शुभारंभ

    दिनांक :17-Jul-2023
Total Views |
शिरपूर जैन, 
Karanja to Shirpur १६ जुलै पासून कारंजा येथुन शिरपूर जैन येथे जाणे-येणे करण्यासाठी एस. टी. बस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. यावेळी शिरपूर बस स्थानक येथे प्रथम फेरीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांनी एस. टी. बसचे पूजन करून आगार व्यवस्थापक रवी मोरे, एस. टी. बसचे चालक व वाहक यांचा सकल जैन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 

Karanja to Shirpur 
 
शिरपूर जैन येथे नियमित दर्शना करिता जाणारा कारंजा येथील जैन समाज लक्षात घेता महामंडळाने सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर फक्त प्रत्येक रविवारी सकाळी ८ वाजता ही बस सेवा सुरू केली आहे. Karanja to Shirpur कार्यक्रमास सर्व जैन समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते. तसेच सर्वधर्म मित्र मंडळ तथा सासआपत्कालीन संस्थेचे शाम भाऊ सवई, सामाजिक कार्यकर्ते रघुजी वानखडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.