नागपूर,
Annabhau Sathe भारतीय साहित्य कलेचे जगविख्यात सम्राट, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा अण्णाभाऊ साठे स्मृतिस्थळ चौक दीक्षाभूमी परिसर येथे त्वरित उभारावा, अशी मागणी जनहित युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे यांनी केली आहे. Annabhau Sathe अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारक ट्रस्ट व जनहित युवा मोर्चाच्या वतीने संयुक्तरित्या अण्णाभाऊंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. Annabhau Sathe
ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी मागील पाच वर्षांपासून मनपा प्रशासनास समाजाच्या वतीने करण्यात येत असून, पुतळ्याचे काम शहरातील प्रख्यात मूर्तिकार शंतनू इंगळे यांना दिलेले आहे. Annabhau Sathe परंतु मनपाच्या हलगर्जीपणामुळे पुतळा निर्मितीचे व उभारणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. Annabhau Sathe यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले, कार्याध्यक्ष पद्माकर बावणे, उपाध्यक्ष गुरुदास बावणे, युवा सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश बावणे, रविंद्र खडसे, सचिन इंगोले, जनहित युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ऋषी अव्हाडकर, प्रतीक ढोक, महासचिव ॲड. सचिन मेकाले, सहकार्याध्यक्ष सचिन शेंडे, प्रा. राहुल हिवराळे, युवा प्रबोधनकार संजय ठोसर, सुधा बावणे, प्रकाश जगताप, सागर जाधव, वैभव इंगोले, हर्ष इंगोले, मोतीराम उबाळे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. Annabhau Sathe
सौजन्य : शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र