पदभरतीवर अॅड. झामरे यांचा आक्षेप
नागपूर,
contract teacher recruitment महनगरपालिकेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने जाहिरात दिली होती. त्यानुसार आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. महानगरपालिकेत दरमहा 25 हजार रुपये मानधनावर 83 कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेवर अॅड. राहूल झामरे यांनी आक्षेप नोंदविला आहे. कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करताना उमेदवार हा टीईटी परीक्षा उत्तीर्ण असावा, असे शासन आदेश असताना मनपा नियमबाह्य ़भरती करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेने 13 जुलै रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेकरिता कंत्राटी शिक्षक भरती करिता माध्यमनिहाय व विषयनिहाय 83 पदांची जाहिरात प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे घेण्यासाठी काढली होती. ज्यामध्ये सर्व कंत्राटी शिक्षकांना सरसकट 25 हजार रुपये 11 महिन्याचा तात्पुरत्या स्वरूपात देण्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने 30 जून 2016 ला शासन निर्णय काढून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाचा सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी) अनिवार्य केली आहे. तसेच 8 ते 10 आणि 11 ते 12 वर्गासाठीही ‘टीईटी’ आणि ‘ टीएआयटी’ परीक्षा बंधनकारक केली आहे. contract teacher recruitment असे असतांना नागपूर महापालिकेने दिलेल्या जाहिरातीत शैक्षणिक पात्रतेची कुठलीच अट घातलेली नाही. या भरतीमध्ये वयोमर्याद 65 वर्ष ठेवण्यात आली आहे. हा प्रकार बेरोजगार युवकांवर अन्याय करणारा आहे. शिक्षकांची पदे भरण्यासाठी महापालिकेत आकृतीबंध मंजूर असून यासाठी कायमस्वरूपी पदांची जाहिरात न काढता कंत्राटी पदावर भरती करून महापालिका प्रशासन मनमानी करीत आहे. ही नियमबाह्य भरती तात्काळ रद्द करावी, अशी मागणीही अॅड. झामरे यांनी केली आहे. यावेळी अॅड. नितीन गवई, अॅड. प्रतिक पाटील, अॅड. राजन फुलझले आदी उपस्थित होते.