तभा वृत्तसेवा
नंदोरी,
Adhik Shrawan Mas दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिक मास येतो. त्यामध्ये सुद्धा सामान्यतः 27 ते 35 महिन्यात अधिक मास येतो आणि दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो. यापूर्वी 2004 मध्ये अधिक श्रावण महिना आला होता. त्यानंतर शके 1964 मध्ये 17 जुलै 2042 ते 15 ऑगस्ट 2042 या कालावधीत अधिक श्रावण मास आहे. Adhik Shrawan Mas मात्र, यानंतरचा अधिक मास हा ज्येष्ठ असणार असून शके 1948 मध्ये 17 मे 2026 ते 15 जून 2026 दरम्यान हा अधिक ज्येष्ठ येईल, असे हिंगणघाटचे पुरोहित शांताराम हिवरकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. यंदाचा श्रावण महिना 59 दिवसांचा आहे.

Adhik Shrawan Mas अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. योगायोग असा झाला आहे की, श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. त्यामुळे यावेळी श्रावण महिना 59 दिवसांचा असेल. कारण यावर्षी दोन महिने श्रावणाचे मानले जातील. Adhik Shrawan Mas अशा स्थितीत अधिक मास असणार्या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभ कार्य होणार नाहीत. सर्व धार्मिक व शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या दुसर्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील.
ज्योतिषीय गणनेनुसार, सौर वर्ष 365 दिवस, 6 तास आणि 11 सेकंदाचे असते. पण चांद्रवर्ष 354 दिवस आणि 9 तासांचे असते. अशास्थितीत, दरवर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे 11 दिवसांचा फरक असतो. Adhik Shrawan Mas अशा स्थितीत सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास 32 महिने, 16 दिवसांनी पुन्हा येतो. अशाप्रकारे दर तिसर्या वर्षी अधिक मास होतो. असाच योगायोग तब्बल 19 वर्षांनंतर यावेळी श्रावण महिन्यात घडला आहे. Adhik Shrawan Mas त्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होणार आहे.
अधिक मास 18 जुलै ते 16 ऑगस्ट Adhik Shrawan Mas
यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून अधिक मास प्रारंभ झाला. 16 ऑगस्ट रोजी संपणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे अधिकमास सुरू होण्याआधीच 15 जुलैला श्रावण शिवरात्री संपेल, पण रक्षाबंधनाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. साधारणत: रक्षाबंधन सण श्रावण शिवरात्रीच्या 15 दिवसांनीच साजरा केला जातो. Adhik Shrawan Mas मात्र, अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात 46 दिवसांचे अंतर राहील.