तभा वृत्तसेवा
अमरावती,
Dr. Anil Bonde भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार 19 जुलै रोजी सकाळी अमरावती जिल्हा भाजपा अध्यक्षाची व अमरावती शहर जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसापासून नवा अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेची प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणे अमरावती ग्रामीण जिल्ह्याच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती शहर जिल्हा अध्यक्षपदी आमदार प्रवीण पोटे यांची नियुक्ती झाली आहे. अमरावती ग्रामीणच्या मावळत्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी व शहर जिल्ह्याचे अध्यक्ष किरण पातुरकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे या नव्या नियुक्त करण्यात आले आहे. दोन्ही अध्यक्ष पदासाठी चार महिन्यापासून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळी नावे चर्चेत होती. नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा झाल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.