तभा वृत्तसेवा
दिग्रस,
अक्षरसम्राट अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांची 18 जुलै रोजी विविध वृत्तपत्राचे पत्रकार प्रतिनिधी यांच्या पुढाकारात विश्रामगृह येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे. येथील कष्टकरी, मजूर वर्गासाठी त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आहेत. पत्रकारांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहचवा असे आवाहन पुण्यतिथी कार्यक‘माचे अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा यांनी केले.
या Annabhau Sathe कार्यक‘मास प्रेस क्लब संस्थापक अध्यक्ष बबन इंगळे, अध्यक्ष रामदास पद्मावार, संजय शुक्ला, दिग‘स तालूका पत्रकार संघटणेचे अध्यक्ष अफजल खान, मजहर खान, अ. रफिक, किशोर कांबळे, काशिफ मिर्झा, ग्रामीण पत्रकार संघटणेचे अध्यक्ष लुकमान खान, माजी नगरसेवक कैलास जाधव व संपादक गौतम तुपसुंदरे उपस्थित होते. यावेळी गौतम तुपसुंदरे, मजहर खान यांनी आपले विचार मांडले. कार्यक‘माचे संचलन अभय इंगळे व आभार किशोर कांबळे यांनी मानले.