तभा वृत्तसेवा
आर्णी,
वन्यप्राणी शेतकर्यांच्या शेतशिवारात येऊन शेतकर्यांच्या शेतातील उभ्या Destruction crops पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले. तालुक्यातील भानसरा येथील कांता पावसे यांचे केळझरा शेतशिवारात 1हेक्टर 62 आर शेत आहे. त्यांच्या शेतात सोयाबीनचे पिक आहे. शेतातील सोयाबीन पिकांची रानडुकराच्या कळपाने नासाडी करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच पवन पावसे यांचे केळझरा शेतशिवारात 1 हेक्टर 37 आर शेत आहे. त्यांच्या शेतात सोयाबीनचे पिक आहे.
या शेतकर्यांच्या शेतात रानडुकराचा कळपाने सोयाबीनचे पिक खाऊन मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी केली. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दोन्ही शेतकर्यांचे 1 लाख रुपयांचे Destruction crops नुकसान झाल्याचे शेतकर्यांकडुन सांगण्यात आले. या बाबतची तक्रार त्यांनी वनविभागाला दिली व झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. वनविभागाचे शंकर नाटककर व कृषी सहायक संतोष चव्हाण यांनी कांता पावसे व पवन पावसे या शेतकर्यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला. तसेच या संदर्भात अर्ज सादर करा, असे शेतकर्यांना सांगण्यात आले.