गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा सत्कार

    दिनांक :19-Jul-2023
Total Views |
नागपूर,
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे (Goseva Commission) अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा नागपूर शहर व जिल्ह्यातील गोशाळा संचाालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. धंतोलीमधील गोरक्षणमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला गोसेवा आयोगाचे सदस्य सनतकुमार गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गोसेवा आयोग संपूर्ण सामर्थ्याने काम करण्यासाठी तयार आहे.
 
Goseva Commission
 
महाराष्ट्रात (Goseva Commission) गोवंश हत्या होऊ नये, गोसंवर्धन, शेतकर्‍यांद्वारे गोपालन हेतू गो आधारित शेती, गोरक्षक कार्यकर्त्यांची सुरक्षा आदी अनेक विषयांवर आगामी काळात काम करायचे आहे. केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न रहाता गोशाळा आत्मनिर्भर व्हाव्यात व युवा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याचे कामही गोशाळा करतील, असे मुंदडा म्हणाले. श्रीकृष्ण गोरक्षण संस्था गोशाळा महासंघाचे प्रदीप कश्यप, प्रवीण कुलकर्णी, खापरी गोशाळेचे सूमित माईनकर, गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. मनोज तत्त्ववादी, उज्ज्वल गोरक्षणचे जे.पी. शर्मा, रवि रोचलदास, अंजली वैद्य, जितू कुंदनानी, अ‍ॅड. शेखर चौरसिया, रोशन भलावी आदी उपस्थित होते.