महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांची 110 वी जयंती साजरी

02 Jul 2023 18:11:32
तभा वृत्तसेवा
पुसद, 
हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपूत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या 110वी जयंतीचा कार्यक‘म वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांनी वसंतराव नाईक चौकामध्ये आयोजित केला होता. सर्वप्रथम ययाती नाईक, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी वसंतराव नाईक यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तद्नंतर वसंतराव नाईक यांचे प्रतिमेस माजी मंत्री डॉ. एनपी हिराणी, माजी आमदार विजय चोंढीकर, प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर, उपाध्यक्ष धनंजय सोनी, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य विजय जाधव, सिराज हिराणी यांनी वसंतराव नाईक Vasantrao Naik यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
 
Vasantrao Naik
 
या प्रसंगी मोहिनी नाईक, मु‘याधिकारी अभिजीत वायकोस, माजी नगराध्यक्ष जाई भागवत, माजी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष विजय चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदबा मोहटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल फुके, माजी जिल्हा परिषद सदस्य राठोड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रतिराव राऊत, जयश्री राठोड, माजी डीवायएसपी दयाराम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, ज्येष्ठ नेते वसंत कान्हेकर, जिल्हा परिषद सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष अनुकूल चव्हाण, पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने, पत्रकार मारोती भस्मे, पत्रकार चव्हाण, पत्रकार गणेश राठोड, कार्यकारी प्राचार्य डॉ. वंदना वानखेडे, माजी प्राचार्य डॉ. गणेश पाटील, प्रा. साधना हरणे, ग‘ंथपाल छाया जतकर, याडीकार पंजाब चव्हाण, प्रमोद हरणे, माजी तहसीलदार अशोक गीते, डॉ. केशव चेटुले, प्राचार्य के. बी. राठोड, बन्सी चव्हाण, दिलीप गुप्ता, श्याम जाधव, श्रीराम आडे, संतोष देशमुख, माजी प्राचार्य नानासाहेब ताटेवार, प्रा. संजय चव्हाण, पद्माकर कोडापे, मु‘याध्यापक गजानन चिंतावार, अरुण येरावार, डॉ. नानवाला, प्रा. विजय राठोड, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी मान्यवर कार्यक‘मास उपस्थित होते. कार्यक‘माचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रतिष्ठनचे कार्यालय प्रमुख उत्तम जाधव यांनी केले.
साकडे..!
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे शिल्पकार व शेतकरी कष्टकर्‍यांचे उद्धारक कै. वसंतराव नाईक Vasantrao Naik यांना त्यांच्या पावन जयंतीनिमित्त विनम‘ अभिवादन करण्यात आले. बा भूमिपूत्रा श्रद्धेय वसंतराव आपण सदैव राज्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व शेती व शेतकरी कष्टकर्‍यांना सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले. आपण यवतमाळ जिल्ह्यासह जेव्हा पुसद या कर्मभूमीत यायचे, तेव्हा पावसाचे आगमन व्हायचेच. त्यामुळे सारा परिसर आनंदून जायचा.
 
 
ही आठवण यासाठी की, यंदा जूनच्या प्रारंभापासून पाऊस नाही. त्यातच 24 जूनपासून 30 जून या जयंती Vasantrao Naik दिनापर्यंत 8 दिवस धारदार पाऊस नाही. कुठे कुठे पाऊस पडला तो मोजकाच. शेतकर्‍यांनी हवामान खाते तज्ज्ञ अभ्यासक यांच्या पाऊस पडण्याच्या अंदाजानुसार पेरण्या सुरू केल्या. त्या आजतागायत सुरूच आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे का होईना, सारेच पावसाचे अंदाज कोरडे होवून आकाशात विरले आहेत. तर दुसरीकडे ज्यांनी पेरण्या उरकल्या ते देखील पावसाने दडी मारल्याने चिंताग‘स्त होऊन आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. आता तर 2 ते 8 जुलैपर्यंत पावसाचे योग नसल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच आषाढी एकादशी येवून गेली. पण विठूराया काही पावला नाही असे वास्तव आहे.
 
 
आज या संकटकाळी वसंतराव नाईक जयंती 1 जुलै हा ‘कृषीदिन’ म्हणून साजरी झाली. या प्रसंगी भूमिपूत्राला एकच साकडे ते म्हणजे पिके जोमाने वर येण्यासाठी सार्वजनिक सर्वत्र ‘मुसळधार पाऊस पडू दे..’ असे ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी साकडे घातले आहे.
Powered By Sangraha 9.0