अजित पवारांच्या रूपात राज्याला मिळाले दुसरे उपमुख्यमंत्री
02 Jul 2023 16:32:32
मुंबई,
Ajit Anantrao Pawar :राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा भूकंप अनुभवला असून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. अजितदादांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी सोहळा पार पडला.अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. हे बघा : महाराष्टाच्या राजकारणात भूकंप? अजितदादा बनणार उपमुख्यमंत्री
अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.