अधिक मासानिमित्त श्रीगुरुचरित्र चक्री पारायण सोहळा

20 Jul 2023 16:03:15
नागपूर, 
Gurucharitra Parayan श्री मंगलादेवी संस्थान मंगरुळ दत्त, अध्यात्म ज्ञानोपासक मंडळ व प.पू. श्री विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र, कर्वेनगर व रेशीमबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 23 जुलै रोजी एकदिवसीय ‘श्री गुरुचरित्र चक्री पारायण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
 

guru 
 
श्री मंगलादेवी संस्थान मंगरुळ दत्त येथे रविवार, 23 जुलै रोजी स. 5.30 ला श्री भगवती मंगला देवी व स्वामी शिलानंद सरस्वती महाराजांना अभिषेक व रुद्र पठण, 9 ते 12 श्री गुरुचरित्र चक्री पारायण, दु. 12 ते 12.30 आरती व प्रसाद, 4 ते 4.30 प.पू. धर्मभास्कर श्री सद्गुरुदास महाराजांचे पाद्यपूजन, यानंतर 4.30 ते 5.30 महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. Gurucharitra Parayan प.पू. गोळवलकर गुरुजींना भगवती मंगलादेवींच्या साक्षात्काराच्या 81 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री मंगलादेवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0