शेती परिसरात रोही प्राण्यांच्या कळपांचा संचार , उभ्या पिकांची नासाडी

20 Jul 2023 20:22:59
साखरखेर्डा, 
परिसरात रोही ( निलगाय ) प्राण्यांनी Destruction crops कळपांनी पेरणी केलेल्या शेतीत मुक्त संचार घातला असून उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत . या प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अन्यथा शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी दिला आहे .
 
Destruction crops
 
साखरखेर्डा , राताळी , शिंदी , सवडद , गुंज , गुंजमाथा , गोरेगाव , काटेपांग्री , बाळसमुंद्र , तांदुळवाडी शेंदुर्जन , दरेगाव पिंपळगाव सोनारा या भागात हरणापेक्षा रोही (निलगाय ) प्राण्याची संख्या भरमसाठ वाढली आहे . एका एका कळपात 50 ते 75 रोही असून एकाच वेळी एका शेतात हे प्राणी घुसले की किमान एक एकर सोयाबीन फस्त करतात . त्याच बरोबर पिकातून उधळत जात असताना पिकांची संपूर्ण नासाडी करतात. या Destruction crops भागात पावसाने हुलकावणी दिली आहे . केवळ रिमझिम पावसावर पीकं तग धरून आहेत . त्यात निलगायीचा त्रास यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकर्‍यांचे शेतातील सोयाबीन फस्त केली असून दुबार पेरणीचे वेळ आली आहे . पवन पंचाळ अमोल गवई, गोरेगाव , प्रमोद तुपकर गुंज , श्रीकृष्ण तुपकर , अशोक देशमुख , तेजराव देशमुख सवडद मोहाडी येथील विलासराव रिंढे , शिवदास रिंढे , बबनराव रिंढे यांचेही प्राण्यांनी नुकसान केले आहे . रोही प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाने न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा तेजराव देशमुख सह शेकडो शेतकर्‍यांनी दिला आहे .
Powered By Sangraha 9.0