सर्तकतेचा इशारा...अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडणार

    दिनांक :21-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Upper Wardha dam विदर्भातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या म्हणजेच अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात ९३ मिमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यातील धरणातील अपेक्षित पाणी पातळी पूर्ण झाली आहे. पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे धरणाचे दरवाजे शुक्रवार 21 जुलै रोजी दुपारी 3 नंतर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
gates of Upper Wardha dam
 
२१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता ८०३ घ. मी. प्र. से. इतका येवा धरणात येत असून दुपारी 3 वाजता धरणाचे जवळपास 4 दरवाजे उघडण्यात येणार आहे. ३०० घ. मी. प्र. से. चा विसर्ग सोडण्यात येणार आहे. प्रकल्पात Upper Wardha dam येणाऱ्या येव्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे व कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.