सा. बा. मंत्री दादा भुसे यांनी केली समृद्धीची पाहणी

22 Jul 2023 13:16:49
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Dada Bhuse सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आज शुक्रवार 21 रोजी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर वर्धा शहरानजीक येळाकेळी जवळ भुसे यांनी थांबून पाहणी केली व अधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक ए. बी. गायकवाड, संजय यादव, ए. एस. मुरडे, मुख्य महाव्यवस्थापक भारत बस्तेवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, भूषण मालखंडारे आदी उपस्थित होते.
 
 
Dada Bhuse
 
भुसे यांनी नागपूर येथील महामार्गावरील पहिल्या टोलप्लाझापासून पाहणी सुरुवात केली. तेथे काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला. Dada Bhuse जिल्ह्यातील मार्गाची पाहणी करत येळाकेळी जवळ आल्यावर त्यांनी तेथे काही काळ अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली व संवाद साधला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीची 58 किलोमीटर लांबी आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे राजेश सराफ, गणेश इखार आदींसह शिंदे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0