नागपूर,
Dhantoli Garden छोटी धंतोली नागरिक मंडळातर्फे छोटी धंतोली उद्यानात वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक कृष्णाजी भागवत यांच्या हस्ते "करंजी" वृक्षाचे रोपण करण्यात आले. Dhantoli Garden पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
नागरिकांनी पण त्यांच्या आवाहनाचे अनुकरण करण्याचे आश्वासन दिले. Dhantoli Garden लावलेल्या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी संजय डब्ली यांनी घेतली. यावेळी सर्वश्री संजय हेजीब, राजेश लोंदे, मनोज जोशी, नरेंद्र तांबे, विजय कातुरे, निलेश जोशी, तेजस डब्ली व वसाहतीतील अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Dhantoli Garden
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र