तपोवनेश्वर एक प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर

24 Jul 2023 07:07:07
श्रावण सोमवार विशेष
 
- श्याम पांडे
दारव्हा, 
Tapovaneshwar Shiva temple : तालुका हा साधुसंतांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो. याच परिसरातील तपोना येथे तपोवनेश्वर हेमाडपंथी शिवमंदिर असून विदर्भात प्रसिद्ध आहे. या मंदिरात दूरदुरून हजारो भाविक श्रावणवारी करतात. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात शिवभक्तांची मोठी गर्दी दिसून येते. मुख्य रस्त्यापासून जवळपास 1 किमी अंतर आहे. सुरवातीला अनेक भाविक शकुंतला रेल्वेने प्रवास करायचे. दारव्हा तालुक्यात बोरी येथून पूर्वेस दीड किमी अंतरावर हे प्राचीन शिवमंदिर आहे. सहा मुख्य द्वार चार मंदिरांमध्ये शिवलिंग, एक दत्तमंदिर आणि एक महाकाल मंदिर आहे. मागील बाजूला हनुमान मंदिर असून स्नानकुंडाच्या शेजारी वडाच्या झाडाखाली तीन शिवलिंग असून एक नागदेवता आहे.
 
Tapovaneshwar Shiva temple
 
प्रत्येक मंदिरामधे (Tapovaneshwar Shiva temple) प्राचीन कलाकुसरीचा नमुना पहायला मिळतो. सध्या ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहेत. तपोनेश्वर नावावरून ही तपोभूमी असल्याचे लक्षात येते. मंदिरावर तप करण्याचे गर्भगृह आहे. यातील स्नानकुंडाच्या शेजारी असलेल्या शिवमंदिराची आख्यायिका आहे. पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करताना सर्वप्रथम नजरेस पडते ते म्हणजे वडाचे झाड आणि त्या खाली असलेले तीन शिवलिंग, त्याला लागून स्नान तलावाच्या बाजूला दोन मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर मोठमोठ्या पाषाणांपासून तयार केलेले आहे. सद्यस्थितित ते मोडकळीस आलेले असल्यामुळे सहसा कोणी आत प्रवेश करीत नाही.
 
Tapovaneshwar Shiva temple
 
या मंदिराची एक आख्यायिका आहे. त्या (Tapovaneshwar Shiva temple) मंदिरातील शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा वेगळे आहे. हे शिवलिंग एका भागाकडून उचलता येते व उचलून ठेवले असावे असे जाणवते. हे शिवलिंग थोडे तिरकस म्हणजे एक भाग वर, एक भाग आतमध्ये असल्याचे दिसते. या मंदिराबाबत असे सांगतात की, या शिवलिंगाखालून एक भुयारी रस्ता जातो आणि त्र्यंबकेश्वरला निघतो. विशेष म्हणजे इथे असलेल्या पुजारी व इतर जाणकार व्यक्तींकडून, या मंदिरातील शिवलिंगाची पूजा केल्यास त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची पूजा केल्याचे पुण्य लाभते, असे सांगण्यात येते.
 
 
या (Tapovaneshwar Shiva temple) तपोभूमीत शिव अभिषेकासाठी एक स्वतंत्र मंदिर आहे. स्नान, पूजा, तप याबाबत विचार केला आणि निरखून पाहिले तरीही संतऋषी यांची तपोभूमी आहे, असे सहजच लक्षात येते. श्रावण महिना आणि भाविकांशी भक्तिमय नाते या माध्यमातून जोडले गेले आहे. श्रावणात पहाटे 5 पासून महिनाभर पूजाआरती करण्यास येतात. श्रावण सोमवारला भाविकांची गर्दी पहायला मिळते. दारव्हा तालुक्यातील लाडखेडच्या परिसरात पंचक्रोशीत पाच हेमाडपंथी शिवमंदिरे आहेत. पूर्वेला चंडिकेश्वर महादेव मंदिर, पश्चिमेला तपोनेश्वर महादेव मंदिर, उत्तरेला नागेश्वर मंदिर, दक्षिणेला दक्षेश्वर महादेव आणि गावात मल्लिकार्जुन महादेव मंदिर आहे. प्रत्येक मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
Powered By Sangraha 9.0