ठगबाज अनंत जैनकडे कोट्यवधींची मालमत्ता

12 किलो सोने, 294 किलो चांदीसह 16.89 कोटीची रोकड हस्तगत

    दिनांक :24-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
नागपुरातील एका व्यापार्‍याच्या तक्रारीवरून नागपूर स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने शनिवारी शहरातील Thugbaaz Anant Jain बुकी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन (40) रा. सिव्हिल लाईन याच्या घरावर धाड टाकून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली. पोलिसांना त्याचा घरून मिळालेल्या प्रॉपर्टीच्या 12 दस्ताऐवज वरून या प्रॉपर्टीची किंमत सुमारे 800 कोटी असल्याचे सांगितले जाते. अनंत जैनला पोलिस कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच त्याने नागपूर गाठून दुबई येथे पलायन केल्याचे सांगितले जाते. त्याला दुबई येथून अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच्याविरुद्ध लूक आउट नोटीसही जारी करण्यात आला आहे. अनंतच्या घरातून पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला आहे. लॅपटॉपच्या तपासणीत मोठे खुलासे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
Thugbaaz Anant Jain
 
ऑनलाइन जुगाराच्या Thugbaaz Anant Jain माध्यमातून नागपुरातील तक्रारकर्ता व्यापाराच्या मुलाला अनंतने 58 कोटींचा गंडा घातला. अनंत जैनकडे 12 ठिकाणी 800 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता असल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी 12 ठिकाणांचे दस्तऐवजही जप्त केले आहेत. शनिवारी अनंत जैनच्या घरी दाखल झालेले नागपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि गोंदिया स्थाने शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी तब्बल 16 तास तपास केला. तपासात 16 कोटी 89 लाख रुपये रोख, 12.403 किलोग्रॅम सोने, 294 किलोग्रॅम चांदी असा 26 कोटी 83 लाख रुपयांच्या मुद्देमाल, एक लॅपटॉप 12 प्रॉपर्टीची दस्तऐवज जप्त केले. या प्रकरणात इतरही बुकिंचा समावेश असल्याने पोलिस त्या दिशेनेही तपास करीत असून अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय पोलिसांनी अनंत जैनचे 14 बँक खाते, 4 बँक लॉकर्स गोठविले आहेत.
 
Thugbaaz Anant Jain
 
अनंत Thugbaaz Anant Jain याचा दुबईत आलिशान फ्लॅट व कार्यालय आहे. तेथे दीड डझन कर्मचारी काम करतात. यासह आग्रा, कोलकाता, गोंदियासह विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्येही त्याने स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे सांगितले जाते. या मालमत्तांची किंमत 800 कोटींच्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनंतने कुठेकुठे स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे, याची माहिती पोलिसांनी निबंधक कार्यालयाला मागितली आहे. ही माहिती आल्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता आहे.