सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले : अमोल येडगे

25 Jul 2023 20:45:03
- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप

यवतमाळ, 
यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा कोविडची आपत्कालीन परिस्थिती होती. आता येथून जातानादेखील पूरपरिस्थिती आहे. कोविड आणि पूरपरिस्थितीसार‘या प्रसंगी केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. येडगे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप व नवीन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या स्वागताचा कार्यक‘म महसूल कर्मचार्‍यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी Amol Yedge अमोल येडगे, डॉ. पंकज आशिया यांच्यासह अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
Amol yedage
 
गेल्या दोन अडीच वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासोबतच त्यांची कामे कमी त्रासात, कमी वेळेत कशी होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले. प्रशासनात काम करताना सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी आपण काम करत असतो. यापुढे देखील सर्वांनी या उद्देशाने काम करत रहावे, अशा शुभेच्छा त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना दिल्या.
 
 
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेले काम आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊ, असे मनोगत नवीन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. येडगे सरांच्या कार्यकाळात महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांनी केलेले चांगले काम यापुढे देखील सर्वांनी मिळून करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी मावळते व नवीन अशा दोनही जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक‘माचे संचालन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले. महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन मावळते जिल्हाधिकारी Amol Yedge अमोल येडगे यांना निरोप दिला.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया रुजू
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या जागी नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया रुजू झाले. मावळते जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ. आशिया हे 2016 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते जळगावला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी भिवंडी महानगरपालिका आयुक्त व नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी होते. डॉ. आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातूनच झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधिन कालावधीत आर्णी येथे नगर परिषद मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
Powered By Sangraha 9.0