केंद्र सरकारची माहिती, भारताची लोकसंख्या 139,23,29,000

25 Jul 2023 18:47:50
नवी दिल्ली, 
India population : भारताची लोकसंख्या नेमकी किती आहे, याबाबतची अधिकृत आकडेवारी मंगळवारी समोर आली आहे. केंद्र सरकारने आज लोकसभेत याबाबतची माहिती दिली. 1 जुलै 2023 रोजी देशाची लोकसंख्या 139 कोटी 23 लाख आणि 29 हजार इतकी असल्याचे या माहितीतून समोर आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सभागृहात लोकसंख्येची माहिती देणारा अहवाल सादर केला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि लोकसंख्या विभागाच्या ऑनलाईन माहितीनुसार, जगात लोकसंख्येबाबत चीन आघाडीवर आहे. चीनची लोकसं‘या 1 जुलै रोजी 142,56,71,000 इतकी होती.
 
India population
 
यानंतर (India population) भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने देशात 1 जुलैपर्यंत किती लोकसंख्या होती, याबाबतची आकडेवारी देणारा अहवाल सादर केला. या तारखेपर्यंत देशात 139,23,29,000 इतकी लोकसंख्या होती, असे यात नमूद करण्यात आले आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नित्यानंद राय म्हणाले की, 2021 मध्ये (India population) जणगणना हाती घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाची नोंद 28 मार्च 2019 रोजी राजपत्रात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देशासह जगभरातच कोरोना महामारीचा उद्रेक झाला आणि जनणनणेची मोहीम अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली.
 
अन्य जातींची जनगणना झालीच नाही
अनुसूचित जाती आणि जनजाती वगळता अन्य कोणतीही जातीनिहाय (India population) जनगणना देशात स्वातंत्र्योत्तर काळापासून झालेली नाही, अशी माहिती नित्यानंद राय यांनी अन्य एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आगामी जनगणनेत अन्य जातींमधील नागरिकांची सविस्तर माहिती गोळा करण्यात यावी, अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी सरकारकडे केली आहे, असे राय यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0