अर्जुनी मोर.च्या शिक्षण विभागाला अखेरची घरघर

    दिनांक :26-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर, 
Arjuni Mor अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सध्या विविध पराक्रमाने गाजत आहे. या पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाही. तसेच गटशिक्षणाधिकारी सुद्धा नाही. अनेक वर्षापासून पंचायत समितीचा कारभार प्रभारी अधिकार्‍यावर सुरू आहे. अर्जुनी मोर. शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी नाही. सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये पदस्थापना असलेले वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आर. एल. मांढरे यांना अर्जुनी मोरगाव गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला आहे.
 
 
Arjuni Mor
 
 तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बागडे यांची पदस्थापना Arjuni Mor अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये असली तरी ते सध्या सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहतात. पंचायत समितीमध्ये वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकार्‍याची दोन पदे मंजूर असून त्यापैकी अनिल चव्हाण यांची पदस्थापना अर्जुनी मोरगाव येथे आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. तर एक पद रिक्त आहे. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांची दोन पदे मंजूर असले तरी येथे पदस्थापना असलेले सुभाष बागडे हे सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये केंद्रप्रमुख यांची 15 पदे मंजूर असून केवळ बी. डब्ल्यू. भांडारकर हे एकमेव केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांना सध्या विस्तार अधिकार्‍यांचे काम देण्यात आल्याची माहिती आहे. तर 14 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची 18 पदे मंजूर असून सध्या सहाच मुख्याध्यापक कार्यरत आहेत. तर बारा पदे रिक्त आहेत. विषय शिक्षकांची 92 पदे मंजूर असून 66 पदे कार्यरत आहेत. तर 26 पदे रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षकांची 335 पदे मंजूर असून 292 शिक्षक कार्यरत आहेत. 46 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे तालुक्यात शिक्षणाचा व या विभागात सावळा गोंधळ सुरू असून या विभागालाच घरघर लागल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाचे लिपिक फुलझेले हे 30 जूनला सेवानिवृत्त झाले. तरीही ते शिक्षण विभागात काम करताना दिसून येत आहेत. तसेच दुसरे लिपिक खोब्रागडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवणी येथे बदली झाली आहे. मात्र त्यांना अर्जुनी मोरगाव पंचायत समितीकडून सोडण्यात न आल्याची माहिती आहे. शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांची रीतसर बदली होत असताना ते बदलीच्या ठिकाणी जात नाही. कार्यरत वेगळ्या पंचायत समितीमध्ये तर पगार वेगळ्या पंचायत समितीमधून घेतल्या जात असल्याची माहिती आहे. शिक्षणासारख्या पवित्र विभागात लक्ष देण्यासाठी जनप्रतिनिधी नापास होताना दिसत आहेत. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी व रिक्त पदावर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची मागणी आहे