स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवनावर आधारीत
नागपूर,
Savarkar's स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घरोघरी पोहचविण्याच्या प्रामाणिक हेतूने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी सिव्हील लाइन्सच्या डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवनावर आधारीत सागरा प्राण तळमळला या नाटकाचा प्रयोग घेतला. याप्रसंगी संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज गोजे,शिवसेना संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, नासुप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार, नरेश गडेकर, प्रविण शर्मा, मोरेश्वर कटारमल, गुलाम रसूल, निलेश तिघरे, परशूराम बोकडे, केतन रेवतकर, सागर मौंदेकर, नरेश मोहाडीकर, नरेंद्र जुनघरे, प्रगती पाटील, अनिता जाधव, नलिनी बोकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हर घर सावकर या शिर्षकांतर्गत राज्याचे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मधुसूदन कालेलकर लिखीत आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित हिंदु तेज सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवनावर आधारीत सागरा प्राण तळमळला या नाटकाचा प्रयोग देशपांडे सभागृहात झाला. दोन अंकी नाटक बघण्यााठी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. Savarkar's सावरकर आणि सावरकरांचे हिंदुत्व प्रत्येकापर्यंत पोहचविणे आणि नवीन तरूण पीढीत नवचैतन्य निर्माण करणे या हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे मत सुरज गोजे यांनी व्यक्त केले. या नाटय प्रयोगाचे सुत्रधार महेश मांजरेकर, तर वि.दा.सावरकर यांची भूमिका साकार करणारे कलावंत अंगद म्हसकर, तसेच इतर भूमिकेत सुनील गोडसे, सुरभी भावे, संध्या म्हात्रे, वरदा साळूंखे, दुर्गेश आकेरकर, रोहित मावळे, शार्दूल आपटे, केदार जोशी, निनाद शेटये, आकाश भडसावळे, नंदू जुवेकर आदींनी उत्कृष्ट भूमिका साकार करीत सावरकारांचा संपूर्ण जीवनपट डोळयासमोर आणला. सावरकरांच्या जीवनातील प्रत्येक घटना बघताना उपस्थितांच्या डोळयातून अश्रू बाहेर काढत होते. नाटय प्रयोगाच्या अखेरीस सर्व कलावंताचा सत्कार करण्यात आला.