पूरग्रस्त महिलांकरिता भाजपाकडून 5 हजार साड्या

    दिनांक :27-Jul-2023
Total Views |
यवतमाळ, 
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसानसुद्धा झाले आहे. त्यामुळे चेरावती फाऊंडेशन व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश महामंत्री Shivani Dani शिवानी दाणी यांनी महिलांकरिता 5000 साड्या नागपूर येथून यवतमाळ येथे पाठविल्या आहेत.
 
 
Shivani Dani
 
Shivani Dani यावेळी भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, जिल्हा सचिव परिक्षित आडे, यवतमाळ जिल्हा व भाजपा युवा मोर्चाचे नागपूर महामंत्री संकेत कुकडे व भक्ती उपस्थित होते.