पवनी नगर परिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा

28 Jul 2023 19:11:49
तभा वृत्तसेवा
पवनी, 
Pavani Nagar Parishad नागरी समस्यांना घेऊन डोन्टवरी गृप तर्फे नगरपरिषद पवनी येथे महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाची पूर्व माहिती देवूनही समस्या ऐकूण घेण्याकरिता मुख्याधिकारी यांनी उपस्थित न राहता जनतेच्या प्रश्नांना बगल दिली. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांशी काहीही घेणेदेणे नसलेले अधिकारी लाभल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
 

Pavani Nagar Parishad 
 
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या व यंदाचा शासनाकडून ‘स्वच्छ सुंदर शहर’ पुरस्कार प्राप्त झालेल्या पवनी शहरात नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. Pavani Nagar Parishad नगर परिषदेपुढे समस्या मांडूनही त्या सुटलेल्या नाही. परिणामी डोन्ट वरी गृपच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चा च्या माध्यमातून जनतेचा रोष दिसून आला.पवनीचे वीर सुपुत्र शहीद मेजर प्रफुल मोहरकर यांच्या बलिदानानंतर शहारत बांधण्यात आलेला शाहिद स्मारकाची अवस्था अत्यंत वाईट असल्याने त्याकडे लक्ष देवून त्याला सुशोभीकरण करावे. भुमिगत गटारी प्रकल्प व तसेच जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजवून पावसात चिखल व उन्हाळ्यात धूळीने आरोग्याची समस्या होणार नाही याकरिता उपाययोजना करावी, जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम लवकररात लवकर पूर्ण करून शहरात पिण्याचे 24 तास पाणी उपलब्ध करावे, शहरात रात्री चोरीच्या घटना वाढल्याने सुरक्षेकरिता शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, शहरातील घाट परिसरांची दुरूस्ती व अंत्यसंस्कारासाठी येणाèयांसाठी योग्य व्यवस्था करावी, प्रशासकाने वार्डनिहाय कर्मचारी नेमून त्यांचा संपर्क क्रमांक जाहीर करावा, अश्या मागण्या मोर्च्यातून करण्यात आल्या. गांधी चौकातून सुरू झालेला मोर्चा नगर परिषदेच्या द्वारावर धडकल्यावर डोन्टवरी गृपचे संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, निशांत नंदनवार यांनी संबोधन केले. यावेळी न.प. मुख्याधिकाèयांनी पूर्वकल्पना देवूनही उपस्थित न राहता ते नागरिकांच्या समस्यांबाबत किती गंभीर आहेत, हे दाखवून दिले. प्रसंगी उपस्थित प्रभारी अधिका-यांनी निवेदन स्विकारून समस्या लवकरच दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
पवनीला सावत्र वागणूक - बावनकर
पवनी शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत असतांना प्रशासक उत्तरदायी नाहीत. क्षेत्रातील आमदार पवनी भागातूनच निवडून येतात, असे ते वारंवार भाषणात सांगतात. परंतु पवनीत त्यांचे आवडते अधिकारी जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे पवनी शहराला सावत्र वागणूक मिळत आहे, अशी खंत डोन्टवरी गृपचे योगेश बावनकर यांनी बोलून दाखविली.
Powered By Sangraha 9.0