वणी,
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. पाचव्यांदा संचालक म्हणून Rakesh Khurana राकेश खुराणा निवडून आले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून चौथ्यांदा त्यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. संपुर्ण राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बनच्या एकूण 37 शाखा आहेत. या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच अविरोध पार पडली.
बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी जुलै 2002 मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या सहकारी संचालकांना विश्वासात घेत बँकेचा कार्यविस्तार संपूर्ण महराष्ट्रात वाढवला आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळानी समन्वय ठेवत ग्राहकांना बँकिंग क्षेत्राशी निगडित आधुनिक सोयी सुविधा दिल्या. बँकेने सामाजिक उपक‘माअंतर्गत विविध कामे करून प्रशासनाला देखील सहकार्य केले आहे. Rakesh Khurana राकेश खुराणा हे वणी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष होते. ते विविध संघटनेच्या माध्यमातुन जनहितार्थ उपक‘म सातत्याने राबवत असतात. सध्यस्थितीत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. पुसद अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.